रियाध झाले मोदीमय

=मुस्लिम महिलांनी दिल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा=
MODI IN RIYADHरियाध, [३ एप्रिल] – भारत मातेचा जयजयकार करण्यावरून काही कट्टरपंथी मुस्लिम नेते आणि कथित धर्मनिरपेक्षवादी राजकीय पक्षांकडून देशातील वातावरण तापविले जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरबमधील रियाध भेटीच्या काळात शेकडो मुस्लिम महिलांनी ‘भारत माता की जय’चा घोषणा देऊन मोदी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. विदेशात राहूनही आपल्या मातृभूमीचा जयघोष करून या मुस्लिम महिलांनी भारतातील ढोंगी धर्मनिरपेक्षवाद्यांना एकप्रकारे चपराकच दिली आहे.
अमेरिकेचा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी शनिवारी सायंकाळी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या भेटीवर येथे आले. आज रविवारी त्यांनी रियाध येथील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) बहुतांश महिलाच कार्यरत असलेल्या कार्यालयाला भेट दिली. रियाधमधील केवळ महिलांसाठीच असलेले हे एकमेव कार्यक्षेत्र आहे, हे विशेष!
टीसीएसमधील बीपीओ सेंटरमध्ये पंतप्रधानांचे भव्य स्वागत करण्यात आले. कार्यालयातील अनेक महिलांनी पंतप्रधानांसोबत सेल्फीही काढल्या. सेल्फी काढताना महिला कर्मचार्‍यांमध्ये आगळाच उत्साह पाहायला मिळाला. यावेळी मुस्लिम महिला कर्मचार्‍यांनी ‘मोदी… मोदी…’ अशा घोषणा देतानाच, ‘भारत माता की जय’ अशाही घोषणा दिल्या. यामुळे येथील वातावरण पूर्णपणे मोदीमय झाले होते.
टीसीएसच्या या संस्थेत एक हजारांवर महिला कार्यरत असून, त्यातील ८५ टक्के महिला सौदी अरबच्या नागरिक आहेत. इस्लामचे पवित्र ठिकाण असलेल्या या देशात जिथे महिलांना वाहन चालविण्याचीही परवानगी नाही, तिथे इतक्या मोठ्या संख्येत महिला कामावर असलेली टाटाची ही एकमेव कंपनी आहे.
यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सौदी अरबची शान असलेल्या येथील महिलांची भेट घेऊन मला खरोखरच आनंद वाटला. येथे जे वातावरण मी अनुभवले, ते भारताला असहिष्णू म्हणणार्‍या जगासाठी सडेतोड उत्तरच आहे. आपण सर्व भारतात या… मी आपल्याला आग्रहाचे निमंत्रण देत आहो. तुम्ही यायलाच हवे. तुमचेही भारतात भव्य स्वागत होईल, अशी ग्वाही मी आज तुम्हाला देतो.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27699

Posted by on Apr 4 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (536 of 2483 articles)


=नईला कादरी यांची मागणी= इस्लामाबाद, [३ एप्रिल] - १९७१ साली पाकिस्तानातून फुटून निघण्यासाठी बांगलादेशला जशी भारताने मदत केली तशीच मदत ...

×