Home » छायादालन, ठळक बातम्या, बंगाल, राज्य » रुपा गांगुली भाजपाच्या उमेदवार, १९४ उमेदवारांची घोषणा

रुपा गांगुली भाजपाच्या उमेदवार, १९४ उमेदवारांची घोषणा

=पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक=

KOLKATA, INDIA  APRIL 9: (L- R) Actress Rupa Ganguly with Rahul Sinha, BJP State president (white kurta) during a releases of BJP Manifesto for forth coming Kolkata corporation election, on April 9, 2015 in Kolkata, India. (Photo by Indranil Bhoumik/Mint via Getty Images)

KOLKATA, INDIA APRIL 9: (L- R) Actress Rupa Ganguly with Rahul Sinha, BJP State president (white kurta) during a releases of BJP Manifesto for forth coming Kolkata corporation election, on April 9, 2015 in Kolkata, India. (Photo by Indranil Bhoumik/Mint via Getty Images)

नवी दिल्ली, [१८ मार्च] – पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या १९४ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपाही ही दुसरी यादी आहे. यात प्रख्यात अभिनेत्री रूपा गांगुली यांचाही समावेश आहे.
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आणि संघटनमंत्री रामलाल उपस्थित होते. पश्‍चिम बंगाल भाजपाचे प्रभारी कैलास विजयवर्गीय, सहप्रभारी सिद्धार्थनाथसिंह आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष दिलीप घोषही यावेळी उपस्थित होते.
पश्‍चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांसाठी ४ एप्रिल ते ५ मे दरम्यान ६ टप्प्यांत मतदान होणार आहे. याआधी भाजपाने ५२ उमेदवारांच्या नावांची आपली पहिली यादी १० मार्चला जाहीर केली होती. भाजपाने आतापर्यंत आपल्या २४६ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27441

Posted by on Mar 19 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, बंगाल, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, बंगाल, राज्य (620 of 2477 articles)


खरगोन (मध्यप्रदेश), [१८ मार्च] - रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर अपलोड करणार्‍या दोघांना ...

×