Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » रेल्वेमंत्री प्रभूंकडून गतिमान एक्सप्रेसला हिरवा झेंडा

रेल्वेमंत्री प्रभूंकडून गतिमान एक्सप्रेसला हिरवा झेंडा

Suresh Prabhu flags off Gatimaanनवी दिल्ली, [५ एप्रिल] – देशातील पहिली सेमी हाय – स्पीड एक्सप्रेस म्हणजे गतिमान एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज मंगळवारी हिरवा झेंडा दाखवला आहे. दिल्ली ते आग्रादरम्यान ही एक्स्प्रेस चालणार आहे. या गाडीला सुरेश प्रभू यांनी हजरत निजामुद्दीन स्टेशनवर हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही गाडी रवाना झाली.
रेल्वेसाठी गतिमान एक्सप्रेसची सुरूवात एक महत्त्वाचे पाऊल आहे. गतिमान एक्स्प्रेस ही देशातील पहिली सेमी हाय – स्पीड असून ती दिल्ली – आग्रा मार्गावर १६० कि.मी. प्रतितास वेगाने धावणार आहे. २०० किमीचे अंतर ही एक्स्प्रेस केवळ ११० मिनिटात पार करेल. आठवड्‌यातील ६ दिवस ही रेल्वे चालणार आहे.
या ट्रेनचे वैशिष्टये म्हणजे विमानामध्ये ज्याप्रमाणे हवाई सुंदरी प्रवाशांचेस्वागत करतात त्याचप्रमाणे गतिमान एक्स्प्रेसमध्ये ट्रेन सुंदरी प्रवाशांच्या स्वागतासाठी हजर असतील. प्रवाशांना विमानात ज्याप्रकारे खानपानपासून तर इतर उच्च दर्जाच्या सुविधा मिळतात तशाच सुविधा या ट्रेनमध्येही मिळणार आहे. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ही ट्रेन संपूर्ण वातानुकूलित आहे. चेअर कारसाठी याचे शुल्क ६९० रूपये आकारण्यात आलेआहे. एक्झिक्युटीव्ह क्लासचं तिकीट १३६५ रूपये आहे. दिल्ली – आग्रावर धावणार्‍या या शताब्दी एक्सप्रेसचे चेअर कारचे शुल्क ५४० असून एक्झिक्युटीव्ह क्लासचे शुल्क १०४० रूपये आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27712

Posted by on Apr 5 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (527 of 2477 articles)


पाटणा, [५ एप्रिल] - संपूर्ण बिहार राज्यात आजपासून दारूबंदी लागू झाली आहे. त्यामुळे राज्यात फक्त देशीच नाही तर विदेशी दारूही ...

×