Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » रोनाल्डो सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

रोनाल्डो सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू

  • चार वेळच्या विजेत्या मेस्सीला पछाडले
  • लागोपाठ दुसर्‍यांदा मिळाला सन्मान

Spain Soccer La Ligaझुरिच, [१३ जानेवारी] – पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदचा महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफाचा वर्षातील सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावला आहे. बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा आपला प्रतिस्पर्धी लियोनेल मेस्सीला मात देत त्याने लागोपाठ दुसर्‍यांदा या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
झुरिच येथे आयोजित फिफाच्या भव्य पुरस्कार सोहळ्यात १० व्या चॅम्पियन्स लीग चषकात रियल माद्रिदकडून मुख्य भूमिका साकारणारा २९ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. यावेळी त्याने बेलोन डिओर पुरस्कारात चार वेळचा माजी विजेत्या मेस्सीला पछाडले. मतमोजणीच्या आधारावर विश्‍वचषक विजेत्या जर्मनीचा गोलरक्षक मॅन्युअल नुएर तिसर्‍या स्थानी राहिला. रोनाल्डोचा समावेश असलेल्या रिअल माद्रिद संघातील सहकारी जेम्स रोड्रिगेजला वर्षातील सर्वोत्तम गोलचा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर जर्मनीचे प्रशिक्षक जोकिम लोव यांना वर्षातील सर्वश्रेष्ठ प्रशिक्षकाचा बहुमान मिळाला. २००८ साली प्रथमच रोनाल्डोला या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले होते. त्यावेळी तो मॅनचेस्टर युनायटेडचा सदस्य होता.
‘तिसर्‍यांदा हा पुरस्कार पटकावणार, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मला सर्व महान फुटबॉलपटूंच्या पंक्तीत विराजमान व्हायचे होते आणि त्यासाठी कठोर मेहनतीची गरज आहे, हे मी जाणतो,’ अशी प्रतिक्रिया पुरस्कार पटकावल्यानंतर रोनाल्डोने दिली.
बार्सिलोना सोडू शकतो : मेस्सी
बेलोन डियोर पुरस्कारात माघारल्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याने पुढील वर्षी मी बार्सिलोनात खेळणे सोडू शकतो, असे म्हटले आहे. मेस्सी बार्सिलोनाला रामराम ठोकू शकतो, अशी चर्चा फुटबॉल वर्तुळात सुरू होती.
ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे वक्तव्य मेस्सीने एक दिवसाआधीच केले होते. मात्र, या वक्तव्याला कलाटणी देत तो म्हणाला, ‘पुढील वर्षी मी कुठे असेन, हे मला ठावूक नाही. माझी कारकीर्द बार्सिलोना आणि माझे गृहनगर न्यूवेल्स (अर्जेंटिना) येथे समाप्त करणार असल्याचे मी अनेकदा स्पष्ट केले आहे. मात्र, पुढील वर्षी मी नक्की कुठे राहील?, हे आत्ताच सांगता येणार नाही. रोनाल्डोने म्हटल्याप्रमाणे फुटबॉलमध्ये उतार-चढाव येत असल्याने काहीही घडू शकते.’
२००९ पासून लागोपाठ चार वर्षे मेस्सीने सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा मान पटकावला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19672

Posted by on Jan 14 2015. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या (2252 of 2479 articles)


=संघटनात्मक सुधारणांबाबत विविध सूचना= नवी दिल्ली, [१३ जानेवारी] - कॉंग्रेस कार्य समितीच्या बैठकीत पक्षाची संपूर्ण धुरा उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे ...

×