Home » छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण » वाघाने केला अमिताभ बच्चन यांचा पाठलाग

वाघाने केला अमिताभ बच्चन यांचा पाठलाग

Amitabh Bachchan Gets Chased By A Tigerमुंबई, [७ ऑक्टोबर] – बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन हे जंगलातून जात असताना ते समोर आणि त्यांच्या मागे वाघ धावत आहे. असे चित्र बीग यांच्या अनेक चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळाले असतील. मात्र त्यांच्या खर्‍या खुर्‍या आयुष्यात हे जेव्हा घडतं तेव्हा…. एक जंगलाचा राजा जेव्हा चित्रपटसृष्टितील राजाच्या मागे धावतो तेव्हा…. असा हा खराखुरा अनुभव बीग बी सोबत इतरांनीही नुकताच बोरिवलीच्या संजय गांधी अभयारण्यात घेतला आहे. तब्बल चार किलोमीटर या वाघाचा हा पाठलाग सुरू होता. अमिताभ बच्चन यांनी स्वतः याबाबतची माहिती आणि फोटो फेसबुकवर पोस्ट केली आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्राचे व्याघ्रदूत म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड केली आहे. ते आता वाघ बचाव मोहिमेसाठी काम करणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात काल वन्यजीव सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पर्यावरण मंत्री रामदास कदमही उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर बच्चन आणि इतर मान्यवर टायगर सफारीसाठी निघाले असता त्यांच्या बसचा एका पट्‌ेदार वाघाने तब्बल ४ किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग केला. अचानक घडलेल्या या वाघाच्या दर्शनाने ‘बिग बी’ चांगलेच खुश झाले. त्यांनी त्या वाघाची अनेक छायाचित्रे काढली आणि मीडियावर शेअर केली.
दरम्यान, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पडेल ते काम करण्याची तयारी बच्चन यांनी दाखवली आहे. जर माझा आवाज किंवा माझा चेहरा या उपक्रमाला फायदेशीर असेल तर अशा उपक्रमासाठी मी केव्हाही तत्पर असेन, असे अमिताभ बच्चन म्हणाले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25026

Posted by on Oct 8 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1365 of 2476 articles)


शेखपुरा (बिहार), [७ ऑक्टोबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाप्रणीत रालोआचे केंद्र सरकार केवळ श्रीमंतांसाठीच काम करीत असून, गरीब ...

×