Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » वाढदिवसानिमित्त लतादीदींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त लतादीदींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा

narendra_modi_lata_mangeshkarमुंबई, [२८ सप्टेबर] – गानकोकिळा म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज बुधवारी वाढदिवस आहे. लता मंगेशकर आज ८७ वर्षांच्या झाल्या. लतादीदींचा आवाज हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये ऐकला जातो. लता मंगेशकरांना जगभरातून शुभेच्छा येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतरत्न लता मंगेशकर यांनी सीमेवर लढणार्‍या जवानांसाठी मोहीम सुरू केली आहे. आजच्या वाढदिवसानिमित्त लतादीदींनी सीमेवर लढताना जायबंदी होणार्‍या जवानांसाठी मदतनिधी उभारण्याचा संकल्प केला आहे. या निधीसाठी सर्व देशवासीयांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही लतादीदींनी केले आहे. माझ्या वाढिदिवसाला भेटवस्तू देण्याऐवजी, चाहत्यांनी सैन्याच्या निधीत योगदान द्यावे, अशी कळकळीची विनंती लता मंगेशकर यांनी केली आहे. ‘‘मी माझ्यापरीने आर्मी वेलफेअर बॅटल कॅज्युअल्टीजमध्ये काही रक्कम जमा करणार आहे. जर तुम्ही पण योगदान दिल्यास मी कायम कृतज्ञ राहीन.
माझ्या प्रत्येक वाढदिवसाला हजारोंच्या संख्येने फुले, मिठाई, केक, ग्रीटिंग कार्ड्स पाठवता. पण, यावेळी मला भेटवस्तू पाठविण्याऐवजी तीच रक्कम आपल्या वीर जवानांसाठी द्या. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत कायम राहील, असा विश्‍वास आहे. जय हिंद, वंदे मातरम्’’ असे ट्विट लता मंगेशकर यांनी केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29318

Posted by on Sep 29 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (90 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२८ सप्टेंबर] - हे जरी खरे असले की कलेला कुठल्याही सीमांच्या बंधनात बांधू नये, तरीही एक नैतिक सहवेदना ...

×