Home » उद्योग, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » विकासासाठी ‘टीम इंडिया’च हवी

विकासासाठी ‘टीम इंडिया’च हवी

=नरेंद्र मोदी यांचा राज्यांना मंत्र=
Narendra Modi's remarks after dedication to the nation of 2.5 MT steel plant at Burnpurकोलकाता, [१० मे] – भारत-बांगलादेश भू-सीमा करारासारख्या समस्यांसह अन्य संकटांवर केवळ ‘टीम इंडिया’च मात करू शकते. एकट्या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला ते शक्य नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार ‘टीम इंडिया’ म्हणून एकत्र आल्यास आपल्याला कोणतीच गोष्ट अशक्य होणार नाही, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी दिला.
आपण जर सारेच एकत्र येऊन विदेशातील मुद्यांवर तोडगा काढू शकतो, तर आपल्या देशातील मुद्यांवर तोडगा काढणे कसे कठीण जाईल, असे मोदी यांनी बर्नपूर येथील अत्याधुनिक इस्को स्टिल प्रकल्पाच्या शुभारंभानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील प्रामुख्याने उपस्थित होत्या.
भारत आणि बांगलादेशला आपापला भाग पुन्हा प्राप्त करण्याची संधी देणारे तसेच अतिरेक्यांना परस्परांच्या स्वाधीन करणारे एतिहासिक घटनादुरुस्ती विधेयक सर्वच राजकीय पक्ष एकत्र आल्यानेच सरकार पारित होऊ शकले आहे. यापुढेही दोन्ही देशांच्या सीमाभागातील समस्या सोडविण्यासाठी पश्‍चिम बंगाल, आसाम, मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरा यासारख्या राज्यांनी केंद्राच्या पाठीशी उभे राहायला हवे. देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी सर्वच राज्यांसोबत सहकार्य करण्यासाठी माझे सरकार वचनबद्ध आहे, असे सांगताना पूर्वीच्या सरकारच्या काळात केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये प्रचंड कटुता होती, यावर पंतप्रधान मोदी यांनी खेद व्यक्त केला.
मी स्वत:देखील अनेक वर्षे एका राज्याचा मुख्यमंत्री राहिलो आहे. केंद्राचे राज्याप्रती असहकार धोरण चांगले नसते, याची जाणीव मला आहे. आपल्या राज्य घटनेत संघीय रचनेचा उल्लेख आहे. मात्र, दुर्दैवाने आतापर्यंत केंद्र-राज्य संबंधांत केवळ तणावच राहिला आहे, असे ते म्हणाले.
राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी एकत्र येऊन ‘टीम इंडिया’ म्हणूनच काम करायला हवे. असे झाल्यासच देशाला विकासाच्या मार्गावर नेणे शक्य होईल. भारतात केवळ दिल्लीचीच सत्ता नाही. दिल्लीच्याच एका खांबावर देश इतक्या मजबुतीने उभा नाही. या देशाला ३० खांबांनी (राज्ये) आधार दिला आहे, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22486

Posted by on May 10 2015. Filed under उद्योग, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उद्योग, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1716 of 2477 articles)


पुणे, [१० मे] - गेली ४० वर्षे महाराष्ट्रात भ्रमंती करून शिवचरित्र्याचा संदेश प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविण्यात एकाग्र राहिलेले इतिहास संशोधक निनाद ...

×