Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » विकास आराखड्याचा अधिकार राज्यांना द्या!

विकास आराखड्याचा अधिकार राज्यांना द्या!

=मुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी=
modi, chauhan, fadanvis, khattarनवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] – राज्य सरकारने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार नीती आयोगाने राज्याला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रविवारी येथे आयोजित नीती आयोगाच्या संचालन परिषदेच्या पहिल्या बैठकीत आपण केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बैठकीनंतर महाराष्ट्र सदनात ते पत्रकारांशी बोलत होते.
आतापर्यंत राज्याचा विकास आराखडा पूर्वाश्रमीचा योजना आयोग तयार करीत होता आणि त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येत असे. मात्र, आता राज्याचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला असला पाहिजे व राज्याने तयार केलेल्या विकास आराखड्याला नीती आयोगाने निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, अशी मागणी बैठकीत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्राच्या ७६ योजनांची अंमलबजावणी राज्य सरकारला करावी लागते. यासाठी लागणारा संपूर्ण निधीही नीती आयोगाने राज्याला दिला पाहिजे, असेही ते म्हणाले. विदर्भ-मराठवाड्याला ३७१ (२) नुसार अतिरिक्त निधी मिळाला पाहिजे, अशी मागणीही केल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नीती आयोगाच्या बैठकीत विकास, गुंतवणूक व रोजगार या तीन मुद्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली. राज्य सरकार शेती विकास, रोजगार निर्मिती व गरिबी निर्मूलन या तीन मुद्यांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट करीत राज्याचा नियोजन आयोग नीती आयोगाच्या सूचनेनुसार काम करेल, असेही त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानाबाबतही नीती आयोगाच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच यावेळी विकासाच्या मुद्यावर खर्‍या अर्थाने ‘टीम इंडिया’चे प्रत्यंतर घडले, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.
दुष्काळी मदत लवकरच
दुष्काळाच्या मुद्यावर राज्याला लवकरच केंद्राकडून निधी मिळणार असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्याला हा निधी देण्याबाबत केंद्रीय समितीची अंतिम बैठक नुकतीच झाली. त्यामुळे आता राज्याला मिळणारा मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील साखर उद्योगाला केंद्राकडून मिळणार्‍या मदतीची फाईलही अंतिम टप्प्यात असल्याची माहितीही फडणवीसांनी यावेळी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20434

Posted by on Feb 9 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2096 of 2477 articles)


= स्विस सरकारची ग्वाही= बर्न/नवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] - काळा पैसा साठविणार्‍या खातेदारांची माहिती प्राप्त करण्यासाठी भारत सरकार स्वित्झर्लंडवर प्रचंड ...

×