Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » विकास हाच भाजपाचा एकमेव कार्यक्रम

विकास हाच भाजपाचा एकमेव कार्यक्रम

  • पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात
  • विरोधकांना धरले धारेवर
  • वाजपेयींच्या योजनांची कॉंग्रेसने नावे बदलली

Narendra Modi in Rajya Sabhaनवी दिल्ली, [३ मार्च] – भाजपावर तुम्ही जातीयवादाचा आरोप करता. पण, भाजपा धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन विचार करीत असते. विकास हाच आमचा एकमेव कार्यक्रम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी राज्यसभेत ठणकावून सांगितले. आमचे सरकार जर केवळ उद्योजक आणि श्रीमंतांचाच विचार करीत असते, तर मग स्वच्छता अभियान आणि जन धन योजना केवळ त्यांच्यासाठीच आहेत का, असा सवाल करीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात राबविण्यात आलेल्या अनेक योजनांची नावे बदलून कॉंगे्रसप्रणीत संपुआ सरकारने नव्याने राबविल्या आहेत, असा जोरदार हल्लाही मोदी यांनी चढविला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी पूर्वीच्या संपुआ सरकारच्या काळातील अनेक निर्णयांवर बोट ठेवले. जन धन योजना असो किंवा गंगा स्वच्छता योजना, त्या उद्योगपतींसाठी आहेत का? असा सवाल करीत, भाजपा सरकारच्या योजनांमधून गरिबांचा विकास साधेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधकांकडून भूसंपादन विधेयकाबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र असे गैरसमज कृपया पसरवू नका. भूसंपादन विधेयकात आवश्यक ते बदल करण्यास आपले सरकार तयार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. शेतकर्‍यांना जमिनीच्या बदल्यात मिळणार्‍या मोबदल्यात कपात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या मोबदल्यात अजीबात कपात होणार नाही, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
संपुआ सरकारने आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात ज्या योजना राबविल्या, त्या अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात तयार झालेल्या योजनांचीच कॉपी आहेत, असे सांगताना मोदी यांनी अनेक योजनांचा उल्लेखही केला. हा देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी जन्माला आला, असे मी कदापि मानणार नाही. हजारो वर्षांपासून भारताचे अस्तित्व आहे आणि हा देश कोणत्या सरकारने घडविला नाही, तर सर्वसामान्य नागरिक आणि मजुरांनी आपला घाम गाळून हा देश घडविला आहे, असे मोदी म्हणाले.
काळ्या पैशाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही संपुआ सरकारने एसआयटीची स्थापना केली नव्हती. कारण, या सरकारला आपल्या भ्रष्ट नेत्यांना वाचवायचे होते, अशी टीकाही मोदी यांनी केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21100

Posted by on Mar 4 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1986 of 2477 articles)


युती सरकारचा दिलासा ७.५० लाख हेक्टर जमिनीवरील पिके व फळांचे नुकसान तिघांचा मृत्यू, १०५ जनावरे दगावली मुंबई, [३ मार्च] ...

×