Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » विठ्ठला, दुष्काळाचे संकट दूर कर

विठ्ठला, दुष्काळाचे संकट दूर कर

  • मुख्यमंत्र्यांनी घातले पांडुरंगाला साकडे
  • सपत्नीक केली महापूजा

devendra fadanvis ashadhi pujaपंढरपूर, [२७ जुलै] – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोमवारी पहाटे आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर येथे विठ्ठल आणि रुख्माईची सपत्नीक महापूजा केली. यावर्षी पाऊस वारंवार दडी मारत असल्याने राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. राज्यावरील हे संभाव्य संकट दूर कर आणि राज्यातील शेतकरी सुखी होऊन महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठ्ठलाला घातले.
आषाढी एकादशीनिमित्त महापूजा करण्याचा पहिला मान मुख्यमंत्र्यांचाच असल्याने मुख्यमंत्री फडणवीस रविवारीच पंढरपुरात दाखल झाले. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी असलेल्या भाविकांच्या रांगेत त्यांच्यासोबत सर्वात पुढे असलेल्या हिंगोली-कळमनुरीतील राघोजी धांडे व त्यांची पत्नी संगीता धांडे यांनाही प्रथेप्रमाणे मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला.
भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या महाराष्ट्रावरील संकट दूर कर, अशी प्रार्थना आपण विठ्ठल आणि देवी रुक्मिणीला केली असल्याचे महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांच्यासोबत राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रियही प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजेनंतर मंदिराजवळच असलेल्या श्री संत तुकाराम भवनात मानाचे वारकरी ठरलेल्या धांडे दाम्पत्याला विठ्ठल-रुक्मिणीची प्रतिमा भेट दिली, तसेच एसटी बसच्या प्रवासाची एक वर्षाची मोफत पास देऊन त्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्री फडणवीस यांचाही मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मिळालेला मान हा माझ्या जीवनातील सर्वाधिक भाग्याचा क्षण आहे. विठुरायाच्या पुजेने एकप्रकारची ऊर्जा आणि शक्ती मला मिळाली आहे. ही ऊर्जा राज्यातील सामान्य जनतेच्या कल्याणासाठी खर्च करणार करणार आहे. शेतकरी सुखी झाला, तर राज्य सुखी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी मध्यरात्रिनंतर दोन वाजून दहा मिनिटांनी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी विठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात झाली. विठूरायाच्या मूर्तीला दूध आणि दह्याचे स्नान घातल्यानंतर विठूरायाची स्वयंभू मूर्ती विलक्षण दिसत होती. त्यानंतर सावळ्या विठूरायाला शुभ्र वस्त्र आणि सुंदर नक्षीकाम केलेला अंगरखा घालण्यात आला. सोन्याचा टोप आणि तुळशीचा हार घालून, गंध व बुक्का लावण्यात आल्यावर विठ्ठलाचे रूप अधिकच खूलून दिसू लागले. आरती झाल्यानंतर सर्वांनी ‘पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल’ असा जयघोष केला. यानंतर देवी रुक्मिणीचीदेखील परंपरेप्रमाणे मनोभावे महापूजा करण्यात आली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23520

Posted by on Jul 28 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1548 of 2476 articles)


=गृहमंत्री राजनाथसिंह यांचा पाकला इशारा= नीमच, [२७ जुलै] - पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज ...

×