Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » विधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात

विधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात

=शोक प्रस्तावावेळी वाद उपस्थित करणे चुकीचे : मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले=
vidhimandal gondhal1मुंबई, [१३ जुलै] – राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सोमवारी वादळी सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशीच्या कामकाज पत्रिकेत शोकप्रस्तावाचा समावेश शेवटी करण्यावर आक्षेप घेत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. तत्पूर्वी, अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि सरकारमधील इतर मंत्र्यांचे विधानभवन परिसरात आगमन होताच विरोधी पक्ष सदस्यांनी शेतकर्‍यांना पूर्ण कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
यापूर्वी शोकप्रस्तावाच्यावेळी यापूर्वी असा वाद कुणी कधीही उपस्थित केला नाही. त्याचे एक महत्त्व आहे, ते अबाधित राहिले पाहिजे. वाद उपस्थित करून दिवंगतांचा अवमान करणे चुकीचे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची कानउघाडणी केली.
पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम्‌ने झाली. त्यानंतर तृप्ती प्रकाश सावंत व सुमन आर. आर. पाटील या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून देण्यात आला. कामकाज पत्रिकेत चौथ्या क्रमांकावर असलेले अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्याचे जाहीर करताच विरोधकांनी हौदात उतरून गोंधळ घातला, घोषणाबाजी केली. यादरम्यान, अध्यादेश, शासकीय विधेयके व सन २०१५-१६ च्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर सादर करण्यात आल्या. त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील आदींनी सभागृहात चाललेल्या कामकाजावर आक्षेप नोंदविला. यावर कामगार मंत्री प्रकाश महेता म्हणाले, अध्यक्षांच्या निर्णयावर हेतूआरोप करणे चुकीचे आहे. तर, मुख्यमंत्र्यांनीही विरोधकांची चांगलीच कानउघाडणी केली.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सदस्य कृष्णा अर्जुन खोडा, गोविंदराव आदिक, डॉ. बळीराम हिरे, सलिम झकेरिया, शेषराव देशमुख, माधवराव पवार, विक्रमसिंह घाटगे, नारायण भगत, संपतराव चव्हाण, किसनराव काळे, शंकर चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव सादर केला. यावेळी सभागृहात शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या.
विधानसभाध्यक्ष संतापले
कामकाज पत्रिकेत शोकप्रस्तावाचा क्रम हा प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर असतो. अशीच आजवरची कामकाजाची पद्धत आहे. त्याचा क्रम का बदलविण्यात आला आणि ही पद्धत बरोबर असेल तर, आजवर सभागृह चुकीच्या पद्धतीने चालले होते का, असा प्रश्‍न उपस्थित केला गेला. तेव्हा आजवरच्या अध्यक्षांनी तयार केलेल्या कामकाज नियमावली पुस्तिकेतील क्रम वाचून दाखविला. त्यात पहिले शपथविधी, प्रश्‍न, राज्यपालांच्या अभिभाषणची प्रत, त्यानंतर आभार प्रदर्शन, मंत्र्यांचा परिचय, अभिनंदन प्रस्ताव आणि त्यानंतर शोकप्रस्ताव असा क्रम दाखवला आहे. यात शोकप्रस्ताव शेवटी का ठेवण्यात आला आणि आजवर का हा क्रम बदलविण्यात आला नाही, असा संतप्त सवाल करून विरोधकांची बोलती बंद केली.
यापूर्वी यापेक्षाही गंभीर घटना घडल्या – मुनगंटीवार
गेल्या पंधरा वर्षांत तुम्हीही अनेकदा कामकाज पत्रिकेत असे फेरबदल केलेत. एवढेच नव्हे तर, सदस्याचे निधन या अधिवेशनात झालेले असताना, त्यांचा शोकप्रस्ताव पुढच्या अधिवेशनात घेण्याचा प्रतापही मागील काळात करण्यात आला आणि कामकाजात शोकप्रस्ताव न दाखवता तो अनपेक्षितपणे सभागृहात मांडण्याचाही प्रकार याच सभागृहात मागच्या कालखंडात घडला. त्यामुळे किमान शोकप्रस्तावावर तरी, अशापद्धतीचे वादंग करू नये, असे दिलीप वळसे-पाटलांनी घेतलेल्या आक्षेपांवर बोलताना वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुनावले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23428

Posted by on Jul 14 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1558 of 2476 articles)


=नव्या अभ्यासातील निष्कर्ष= लंडन, [१३ जुलै] - ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे त्यातील काही कण वातावरणात मिसळत असतात आणि या कणांच्या प्रभावामुळे ग्लोबल ...

×