Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » विविधतेत एकता हीच भारताची ताकद

विविधतेत एकता हीच भारताची ताकद

=एनसीसी कॅडेट्‌सने देशाकरिता कार्य करावे : पंतप्रधानांचे आवाहन=
Prime Minister, Shri Narendra Modi inspecting the Guard of Honour, during the Prime Minister's NCC Rally, in New Delhi on January 28, 2015नवी दिल्ली, [२८ जानेवारी] – एनसीसी कॅडेट्‌सने देशाच्या उज्वल भवितव्याकरिता कार्य करावे, असे आवाहन करताना, विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी ताकद असल्याचे आणि या एकतेतूनच आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी केले.
भारत तरुणांचा देश आहे आणि हे आपले फार मोठे भाग्य आहे. यामुळे आपले स्वप्न आणि ऊर्जाही तरुणच आहे. आपण जेव्हा परेडमध्ये सहभागी होतो, तेव्हा आपण देशाबद्दलची जबाबदार पार पाडतो, असे मोदी यांनी दिल्लीतील लष्करी परेड ग्राऊंडवर एनसीसी कॅडेट्‌सना संबोधित करताना सांगितले.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये एनसीसी कॅडेट्‌सच्या उपस्थितीचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यावेळी माझ्यापुढे ‘लघू भारत’ आणि भारताचे भविष्यातील ‘लघू स्वरूप’ होते. कॅडेट म्हणून जेव्हा आपण समुहात राहाण्याचा अनुभव घेत असतो, त्यावेळी आपल्याला ऐकतेचाही अनुभव येतो. विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे आणि हीच ताकद आपल्याला प्रेरणा देते.
मीदेखील शाळेत असताना एनसीसी कॅडेट राहिलो आहे, अशी आठवण करून देताना, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज हेदेखील एनसीसीत होते, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. मी एनसीसीत असताना कधीही दिल्लीला येण्याची संधी मिळाली नाही. पण, माझ्या शाळेतील ज्या कॅडेट्‌सला दिल्लीतील परेडमध्ये सहभाग मिळाला होता, ते शाळेत सेलिब्रिटी झाले होते, असे सांगताना भारताला योग्यप्रकारे समजून घेण्याच्या अभियानात कॅडेट्सने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20153

Posted by on Jan 29 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2159 of 2477 articles)


=अमेरिकन मीडियाचा दावा= नवी दिल्ली, [२८ जानेवारी] - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनासाठी खास पाहुणे म्हणून २५ ...

×