Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » व्याघ्र संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार प्रेरणादायी – अमिताभ बच्चन

व्याघ्र संवर्धनासाठी तरुणांचा पुढाकार प्रेरणादायी – अमिताभ बच्चन

=मुनगंटीवारांच्या उपस्थितीत संदेश रॅलीचा शुभारंभ=
Amitabh Bachchan during the flag off of Tiger Conservation Bike Rally, in Mumbaiमुंबई, [२४ ऑक्टोबर] – उच्चपदस्थ तरुणांनी आपल्या कार्यबाहुल्यातून वेळ काढत व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश देण्यासाठी मोटारबाईक रॅली काढून समाजासमोर नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. सामाजिक जाणिवेचे भान बाळगत या तरुणांनी घेतलेला हा पुढाकार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते तथा महाराष्ट्राचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांनी येथे केले.
शनिवारी काढण्यात आलेल्या व्याघ्र संवर्धन संदेश रॅलीच्या शुभारंभप्रसंगी अमिताभ बच्चन बोलत होते. अलायन्स रायडिंग नाईटस् या संस्थेच्या माध्यमातून दिनांक २४ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत व्याघ्र संवर्धन संदेश रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचा शुभारंभ व्याघ्रदूत अमिताभ बच्चन आणि वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. मुंबईतील जुहू परिसरातील जनक कार्यालयापासून या रॅलीचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश घेऊन निघालेली ही रॅली लोकजागरणासाठी आहे. वनसंवर्धन, वनसंरक्षण तसेच वन्यजीव संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात आम्ही विविध ७१ निर्णय घेतले आहेत. ही प्रक्रिया लोकसहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे लोकसहभाग वाढावा यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी या प्रक्रियेत व्याघ्रदूत म्हणून योगदान देण्याची जबाबदारी स्वीकारली हे आमचे भाग्य आहे. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत तरुणांनी या रॅलीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल वनमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
रॅलीत सहभागी होणार्‍या तरुणांचे अमिताभ बच्चन आणि सुधीर मुनगंटीवार यांनी स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या रॅलीत मुंबई-ठाण्याहून २० मोटार सायकलस्वार सहभागी होणार आहेत. ही रॅली मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांना भेट दिल्यानंतर शेवटी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन परतीच्या प्रवासाला निघेल. व्याघ्र रॅलीत सहभागी होणार्‍या मोटारसायकलकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांना वाघाच्या कातड्याच्या रंगाने रंगविले आहेत. सदर रॅली वाघाचे अन्न साखळीतील महत्त्व, वाघाबद्दलची सर्वसाधारण माहिती, वाघांची संख्या, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प याबाबतची माहिती देत व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहचविणार आहेत.
या रॅलीत राजीव तेलंग, हर्षीनी कान्हेकर, प्रणिष उरणकर, प्रथमेश साबळे, आनंद मोहनदास, विक्टर पॉल, ओमयार वाटच्या, श्रीराम गोपालकृष्णन्, शार्दूल चामलाटे, शाहनवाज बोंदरे, मुनिष चेतल, पल्लवी राऊत, योगेश आंबेकर, योगेश साळुंखे, जितू गडकरी, अदनान तुंगेकर, निसर्ग अग्रवाल, चंदन ठाकुर, दिपक ग्रेग्रथ, राहुल शिंदे, आकाश साळवे, दिनेश सिंग, अभिजित पी हे शिलेदार मोटारसायकलवर स्वारी करत सहभागी झाले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव भगवान, मुख्य वनसंरक्षक के. पी. सिंग, अनवर अहमद, भाजपा नेत्या एन. सी. शायना, अभिजित सामंत, नगसेवक सुनील यादव, अमोल जाधव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25300

Posted by on Oct 25 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (1289 of 2476 articles)


मुंबई, [२४ ऑक्टोबर] - बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धमेंद्र यांचे धाकटे बंधू आणि अभिनेता अभय देओल यांचे वडिल अजित देओल यांचे ...

×