Home » कला भारती, छायादालन, ठळक बातम्या » शशी कपूर यांना दादासाहेब फाळके

शशी कपूर यांना दादासाहेब फाळके

Shashi-Kapoor_0नवी दिल्ली, [२३ मार्च] – प्रख्यात चित्रपट निर्माते आणि अभिनेते शशी कपूर यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार सोमवार, २३ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. कपूर घराण्यात वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यानंतर हा सन्मान प्राप्त करणारे ७७ वर्षीय शशी कपूर हे तिसरे सदस्य ठरले आहेत.
नमक हलाल, दिवार, कभी कभी, हम पांच यासह शंभरावर चित्रपटांमधून आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे शशी कपूर यांची पाच सदस्यीय ज्युरींनी या पुरस्कारासाठी निवड केली. सुवर्ण कमळ, १० लाख रुपये रोख आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. व्हीलचेअरच्या साह्याने हालचाल करणारे शशी कपूर यांना किडनीचा आजार आहे. २०१४ च्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा मानकरी ठरविण्यासाठी सरकारने पाच सदस्यीय ज्युरींची निवड केली होती. या पॅनेलने एकमताने शशी कपूर यांच्या नावाची निवड केली असल्याचे घोषित करण्यात आले. शशी कपूर यांनी केवळ भारतीय चित्रपट सृष्टीतच नव्हे, तर थिएटर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोलाचे योगदान दिले आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे ते ४६ वे मानकरी ठरले आहेत. या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पुतणे ऋषी कपूर यांनी आपले काका अर्थात शशी कपूर यांचे अभिनंदन केले आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांचे योगदान अभूतपूर्व असेच आहे. या सर्वोच्च पुरस्काराचा मान त्यांना मिळायलाच हवा होता, असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21697

Posted by on Mar 24 2015. Filed under कला भारती, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कला भारती, छायादालन, ठळक बातम्या (1859 of 2482 articles)


सिंगापूर, [२३ मार्च] - सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कून यू यांचे आज सोमवारी आजारपणामुळे निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. ...

×