Home » कला भारती, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » शशी कपूर यांना फाळके पुरस्कार प्रदान

शशी कपूर यांना फाळके पुरस्कार प्रदान

=केंद्रीय मंत्री जेटली यांनी केला सन्मान=
Arun Jaitley presented the Dada Saheb Phalke Award to Shashi Kapoor, at Prithvi Theatre, in Mumbaiमुंबई, [१० मे] – भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना आज रविवारी अतिशय प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये आयोजित विशेष सोहोळ्यात केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते शशी कपूर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शशी कपूर यांचा नातू आणि चित्रपट सृष्टीतील नवोदित स्टार रणबीर कपूरच्या आवाजातील विशेष वृत्तपट या सोहोळ्यात दाखविण्यात आला. या कार्यक्रमात कपूर कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. याशिवाय, सहस्त्रकातील महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री रेखा, वहिदा रहमान, हेमामालिनी, आशा भोसले, जावेद अख्तर, राज बब्बर यासारखे दिग्गजही यावेळी उपस्थित होते.
गेल्या आठवड्यात राष्ट्रपती भवनात आयोजित ६२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहोळ्यात शशी कपूर यांना प्रकृती अस्वस्थामुळे पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे त्यांना मुंबईतच सन्मानित करण्याचे केंद्र सरकारने ठरविले होते. त्यानुसार, आज रविवारी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी पृथ्वी थिएटरमध्ये विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार शशी कपूर यांना मार्चमध्ये जाहीर करण्यात आला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22480

Posted by on May 10 2015. Filed under कला भारती, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कला भारती, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1722 of 2486 articles)


=हवामान खात्याच्या अधिकार्‍याची माहिती= नवी दिल्ली, [१० मे] - रखरखत्या उन्हापासून दिलासा मिळावा, यासाठी ज्याची आपण आतुरतेने प्रतीक्षा करीत आहोत, ...

×