Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » शार्ली एब्दोने पुन्हा प्रकाशित केले पैगंबरांचे व्यंग्यचित्र

शार्ली एब्दोने पुन्हा प्रकाशित केले पैगंबरांचे व्यंग्यचित्र

cartoonist_charlie_hebdo and cartoonपॅरिस, [१३ जानेवारी] – अलीकडेच भीषण दहशतवादी हल्ला झालेल्या शार्ली एब्दो या व्यंग्यचित्र साप्ताहिकाने पुन्हा एकदा उद्या बुधवारी प्रकाशित होणार्‍या आपल्या नव्या अंकाच्या कव्हर पेजवर मोहम्मद पैगंबर यांचे व्यंग्यचित्र रेखाटले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी या साप्ताहिकावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात साप्ताहिकाचे संपादक, १० पत्रकार आणि दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता. अल् कायदा या जहाल दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पण, या हल्ल्याची जराही तमा न बाळगता साप्ताहिक आपला बुधवारचा अंक तयार करण्यात व्यस्त आहे आणि विशेष म्हणजे, या अंकात पुन्हा एकदा मोहम्मद पैगंबरांचे व्यंग्यचित्र प्रकाशित करण्यात येणार आहे. या मुखपृष्ठावर पैगंबर यांनी आपल्या हातात ‘मी शार्ली’ अशी पाटी घेतली आहे आणि व्यंग्यचित्राच्या वरील भागात ‘मी सर्वांवर मात केली’ असे लिहिले आहे.
दरम्यान, साप्ताहिकाचे वकील रिचर्ड माल्का यांनी फ्रान्स रेडिओशी बोलताना सांगितले की, दहशतवाद्यांपुढे आम्ही झुकणार नाही, हाच संदेश मासिकात काम करणार्‍यांना देणे आवश्यक असल्यानेच आम्ही हे धाडस केले आहे. या आधी साप्ताहिकाच्या सुमारे ६० हजार प्रती छापल्या जात होत्या. पण, ताज्या अंकाच्या जवळपास तीन लाख प्रती छापल्या जात आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19660

Posted by on Jan 14 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (2255 of 2483 articles)


नवी दिल्ली, [१३ जानेवारी] - पत्नी सुनंदा पुष्करच्या हत्या प्रकरणामुळे सध्या अडचणीत सापडलेले वरिष्ठ कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री ...

×