Home » छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र » शिवशक्ती संगम आज पुण्यात

शिवशक्ती संगम आज पुण्यात

=तयारी अंतिम टप्प्यात=
पिंपरी, [२ जानेवारी] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने पुण्यातील मारुंजी या गावी उद्या रविवार ३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती संगम या भव्य कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्यासह महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, महात्मा फुले यांचे खापरपणतू चंद्रशेखर, नितीन आणि दत्ता फुले, सातार्‍यातील हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव मोहिते, संगमनेर येथील उद्योजक संजय मालपाणी, पतीत पावन संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मारुंजी गावातील सुमारे ४५० एकरच्या मोठ्या पटांगणावर या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेले व्यासपीठ २००/१०० फुटाचे असून व्यासपीठाच्या मागे रायगडाची भव्य दुर्ग प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी ७० फुटी उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. परिसरात बाहेरगावावरून आलेल्या स्वयंसेवकांसाठी ४० सिद्धता केंद्रे उभारण्यात आली असून एका केंद्रामध्ये सुमारे दोन ते तीन हजार स्वयंसेवक थांबू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमादरम्यान सुमारे दीड हजार स्वयंसेवक बॅण्ड प्रात्याक्षिक सादर करणार आहेत. या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठीही भव्य पार्किंग व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बाहेरगावाहून आलेल्या स्वयंसेवकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमधून सुमारे ८० हजार घरांमधून पुरी-भाजीच्या फुड पॅकेट्सचे संकलन करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी १४ प्राथमिक वैद्यकीय उपचार केंद्रांची सोय करण्यात आली असून तातडीच्या मदतीसाठी २० रुग्णवाहिका व २०० डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर १५ हजारांपेक्षा अधिक शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी स्वतंत्र विमा संरक्षण घेण्यात आले आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रातील सात शासकीय जिल्ह्यांमधील संघ स्वयंसेवकांचे एकत्रिकरण करण्याच्या उद्देशाने शिवशक्ती संगम या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व तालुके, बाजार केंद्रे, तसेच प्रत्येक शहरांमधून संपर्क अभियान राबविण्यात येणार असून संघाचे कार्य गावा-गावात पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
शिवशक्ती संगमसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने प्रथमच ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून त्याला स्वयंसेवकांकडून उदंड प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत सुमारे एक लाख ५७ हजार ७०० स्वयंसेवकांनी या कार्यक्रमासाठी नोंदणी केली आहे. नोंदणीशिवाय स्वयंसेवकांना संघस्थानी प्रवेश करता येणार नसल्याचे संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे शहरातील ७५०० स्वयंसेवक या कार्यक्रमाचे व्यवस्थापकीय नियोजन करीत आहेत. यात दोन हजार महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून येणार्‍या नागरिकांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने बसेसची व्यवस्था करण्यात आली असून यासाठी अगदी अत्यल्प दर आकारण्यात येणार आहे.
शिवशक्ती संगम कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे जिल्हा विभाग संघचालक संभाजी गवारे यांच्या हस्ते जेजुरी येथील खंडोबा देवाला अर्पण करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26390

Posted by on Jan 3 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, प.महाराष्ट्र (947 of 2476 articles)


पिंपरी - चिंचवड, [२ जानेवारी] - पिंपरी चिंचवड येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...

×