Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » शौर्य, त्यागाच्या स्मृती कायम स्मरणात राहतील

शौर्य, त्यागाच्या स्मृती कायम स्मरणात राहतील

=वाढदिनी पंतप्रधानांची शौर्यांजली प्रदर्शनाला भेट=
SHAURYANJALI MODIनवी दिल्ली, [१७ सप्टेंबर] – १९६५ च्या भारत-पाक युद्धात आमच्या सशस्त्र दलांनी दाखविलेले शौर्य आणि केलेल्या त्यागाच्या स्मृती प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमच्या कोरल्या जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
१९६५ च्या युद्धातील विजयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त भारतीय लष्कराने आयोजित केलेेल्या प्रदर्शनाला आज गुरुवारी ६५ वा वाढदिवस साजरा करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. भारतीय जवानांनी केलेला अतुलनीय पराक्रम आणि बलिदान याची आठवण आमच्या मनात कायम राहील आणि प्रत्येक भारतीयाला याचा सार्थ अभिमान आहे, असे पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राजधानी नवी दिल्लीतीत एक ऐतिहासिक ठिकाण असलेल्या इंडिया गेटजवळील विस्तीर्ण लॉनवर भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देताना पंतप्रधान मोदी यांनी सुमारे दोन तास तेथे घालविले. यावेळी मोदी यांनी पाक लष्कराकडून ताब्यात घेण्यात आलेले पॅटर्न व शेर्मन हे रणगाडे आणि ‘लाहोर १३ किमी’ अशी नोंद असलेल्या मैलाच्या दगडाबद्दल सखोल चौकशी केली. भारतीय सैनिकांनी पाकमध्ये किती आतपर्यंत प्रवेश केला होता हे सिद्ध करणारे पुरावे म्हणून या वस्तूंकडे बघितले जाते. ७०० मीटर परिसरात सुरू असलेल्या या प्रदर्शनात कच्छच्या रणात युद्धाला प्रारंभ झाल्यापासून ते ताश्कंदच्या तहादरम्यान घडलेल्या अनेक घडामोडी सचित्र सादर करण्यात आल्या आहेत.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री (स्वतंत्र प्रभार) धर्मेंद्र प्रधान, जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्यासह इतर काही मंत्री व सहकारी यावेळी पंतप्रधानांसोबत होते. लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी या युद्धामधील विविध पैलूंची माहिती पंतप्रधानांना दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23869

Posted by on Sep 18 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1461 of 2477 articles)


राज्य सहकारी बँकेतील घोटाळा पृथ्वीराज चव्हाण यांनी साधले शरसंधान मुंबई, [१६ सप्टेंबर] - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळा म्हणजे ...

×