Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » श्रीश्री रविशंकर, रजनीकांत, रामोजीराव यांना पद्मविभूषण

श्रीश्री रविशंकर, रजनीकांत, रामोजीराव यांना पद्मविभूषण

  • अनुपम खेर, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, उदितनारायण यांना पद्मभूषण
  • ऍड. उज्वल निकम, बाहुबलीचे दिग्दर्शक राजमौली, मधुर भांडारकर, अजय देवगण, प्रियंका चोपडा पद्मश्रीचे मानकरी
  • धिरुभाई अंबानी यांना पद्मविभूषण मरणोत्तर

ambani-ravishankarji-rajani-ramoji-amupamनवी दिल्ली, [२५ जानेवारी] – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज रविवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, अध्यात्मिक गुरू श्रीश्री रविशंकर, सुपरस्टार रजनीकांत, माध्यमसम्राट रामोजीराव, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांना पद्मपुरस्कारातील सर्वोच्च मानला जाणारा पद्मविभूषण जाहीर झाला आहे. यावेळी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी बहुमान कोणालाच जाहीर करण्यात आला नाही.
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात सरकारी वकील म्हणून काम करणारे आणि या बॉम्बस्फोटातील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी आपले वकिली कौशल्य पणाला लावणारे ऍड. उज्वल निकम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा धिरुभाई अंबानी यांना पद्मविभूषण मरणोत्तर जाहीर करण्यात आला. पद्मविभूषण प्राप्त करणार्‍या मान्यवरांमध्ये नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती, शास्त्रीय गायिका गिरिजादेवी, अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या डॉ. विश्‍वनाथन शांता आणि शास्त्रज्ञ वासुदेव कालकुंटे अत्रे यांचाही समावेश आहे. अमेरिकेतील अविनाश दीक्षित यांनाही कला आणि साहित्य सेवेसाठी पद्मविभूषण जाहीर झाला आहे.
कॅगचे माजी प्रमुख विनोद राय, चित्रपट कलावंत अनुपम खेर, बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल, टेनिसपटू सानिया मिर्झा, गायक उदित नारायण, माजी अमेरिकी राजदूत रॉबर्ट डी. ब्लॅकविल, बेनेट कोलमन कंपनीच्या इंदू जैन, बिजेंदरसिंह हमदर्द, स्वामी तेजोमयानंद, प्रा. एन. एस. रामानुजनाचार्य, प्रा. डी. नागेश्‍वर रेड्डी, राम सुतार, रंगभूमी कलाकार हीसनाम कन्हईलाल आणि डॉ. यर्लागड्डा लक्ष्मीप्रसाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. अनुपम खेर यांना २००४ मध्ये पद्मश्री सन्मानित करण्यात आले होते.
बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली, चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, चित्रपट कलाकार अजय देवगण, अभिनेत्री प्रियंका चोपडा, भोजपुरी गायिका मालिनी अवस्थी, तिरंदाज दी. पिकाकुमारी, सुशील दोषी यांना पद्मश्रीने गौरवान्वित केले जाणार आहे. चित्रपट कलाकार सईद जाफरी यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये शास्त्रीय नृत्यांगना प्रतिभा प्रल्हाद, लोकसंगीत गायिका भिकुनंदा गढवी, श्रीभास चंद्रा सुपाकार, शास्त्रीय गायक तुलसीदास बोरकर, शास्त्रीय गायक सोमा घोष, चित्रपट दिग्दर्शक नीला माधव पांडा, एम. वेंकटेश कुमार, गुलाबी सपेरा, ममता चंद्राकार, जयप्रकाश लेखीवाल, के. लक्ष्मी गौड आणि भालचंद्र दत्तात्रय यांचा समावेश आहे.
विनोद राय यांनी संपुआ सरकारने आपल्या कार्यकाळात केलेल्या टु-जी स्पेक्ट्रम आणि कोळसा खाण वाटपावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते.
कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, विज्ञान, चित्रपट, समाजसेवा आणि अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना दरवर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाते. ११८ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. १० जणांना पद्मविभूषण, १९ जणांना पद्मभूषण आणि ८९ जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रपती भवनात होणार्‍या समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केले जाते.
१९५४ मध्ये पद्म पुरस्कार सुरू करण्यात आले. तेव्हापासून १९७८, १९७९, १९९३ आणि १९९७ चा अपवाद वगळता दरवर्षी पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26640

Posted by on Jan 27 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (875 of 2477 articles)


कोलकाता, [२५ जानेवारी] - पश्‍चिम बंगाल विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना, नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी ...

×