Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » श्री श्री रविशंकर, जगमोहन, दीक्षित पद्मविभूषणने सन्मानित

श्री श्री रविशंकर, जगमोहन, दीक्षित पद्मविभूषणने सन्मानित

  • धिरूभाई अंबानी यांचा मरणोत्तर सन्मान
  • अनुपम खेर, सायना नेहवालला पद्मभूषण बहाल

srisri ravishankarji padma01नवी दिल्ली, [२८ मार्च] – राष्ट्रपती भवनात झालेल्या एका शानदार समारंभात आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विविध क्षेत्रातील ५६ मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले. आज ५ जणांना पद्मविभूषण, ८ जणांना पद्मभूषण तर ४३ जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. आज महाराष्ट्रातील एकाला मरणोत्तर पद्मविभूषण, दोघांना पद्मभूषण तर सहा जणांना पद्मश्रीने गौरव करण्यात आला. पद्म पुरस्कार प्राप्त विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील ९ जणांचा समावेश होता.
उद्योगपती धिरूभाई अंबानी यांना आज मरणोत्तर पद्मविभूषण किताब बहाल करण्यात आला. त्यांच्या पत्नी कोकिळाबेन अंबानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज श्री श्री रविशंकर, जगमोहन, यामिनी कृष्णमूर्ती आणि अविनाश कमलाकर दीक्षित यांना पद्मविभूषणने सन्मानित केले.
चित्रपट अभिनेते अनुपम खेर, क्रीडापटू सायना नेहवाल, माजी महालेखा नियंत्रक आणि परीक्षक विनोद राय, हफीज सोराब कॉन्ट्रॅक्टर, पालोनजी शापूरजी मिस्त्री, बरजिंदरसिंह हमदर्द, डॉ. ए. वेंकट रामाराव आणि डॉ. डी. नागेश्‍वर रेड्डी यांना पद्मभूषण पुरस्काराने अलंकृत करण्यात आले.
चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेता अजय देवगण, ओंकारनाथ श्रीवास्तव, पुष्पेश पंत, अशोक मलिक, अजयपालसिंह बग्गा, दीपिका कुमारी, मोहम्मद इम्तियाज कुरैशी यांच्यासह ४३ जणांना पद्मश्रीने गौरवान्वित करण्यात आले. कला व चित्रपट क्षेत्रातील कामगिरीसाठी अनुपम खेर यांना तर वास्तुशास्त्रातील योगदानासाठी हफीज कॉन्ट्रक्टर यांना सन्मानित करण्यात आले. जाहिरात व संवाद क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पियुष पांडे, व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिलीप संघवी, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रगतशील शेतकरी सुभाष पाळेकर आणि विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी प्रा. डॉ. गणपती दादासाहेब यादव यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. गोव्यातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित तुळशीराम बोरकर यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात जन्मलेले पण सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेले प्रसिद्ध शिल्पकार रा. म. सुतार यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
आज झालेल्या समारंभाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू, मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी आणि ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्या मंगळवारी दुसर्‍या टप्प्यातही पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ११२ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27634

Posted by on Mar 29 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (555 of 2480 articles)


६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा बाहुबली, दम लगा के हईशा सर्वोत्कृष्ट चित्रपट नवी दिल्ली, [२८ मार्च] - ६३ ...

×