Home » छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ » संघाच्या वृंदावन येथील समन्वय बैठकीला प्रारंभ

संघाच्या वृंदावन येथील समन्वय बैठकीला प्रारंभ

वृंदावन, १ सप्टेंबर –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण तसेच दीपप्रज्वलन केल्यानंतर शुक्रवारी वृंदावन येथे संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीला प्रारंभ झाला.
सह सरकार्यवाह सुरेश सोनी यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले की, भारताच्या प्राचीन आध्यात्मिक विचारधारेला सोबत घेत आम्ही सर्व संघटना समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करीत आहोत. बदलते जागतिक संदर्भ, देशातील परिस्थिती तसेच आपल्या संघटनेची स्थिती यांचे योग्य आकलन करीत, आम्हाला आपापल्या क्षेत्रात वाटचाल करायची आहे. कुठल्याही कार्याचे उपेक्षा, विरोध आणि स्वीकार हे तीन टप्पे असतात. पहिले दोन टप्पे पार करून आम्ही आता समाजाच्या स्वीकृतीचा अनुभव घेत आहोत. वैश्‍विक घडामोडी, देशाची विद्यमान स्थिती आणि आपल्या संघटनेची स्थिती यांचे योग्य आकलन व्हावे, तसेच या उद्देशाने विविध विषयांवर या ठिकाणी तीन दिवस चर्चा होणार आहे. आपले बाह्य जगत व अंतर जगत यांच्यात समन्वय साधत, परस्पर समन्वयाने आम्हाला पुढची वाटचाल करायची आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Short URL: https://vrittabharati.in/?p=34890

Posted by on Sep 3 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ (34 of 2478 articles)


‘‘भगव्या दहशतवादाची ही भीती निव्वळ ढोंग होती. एक प्रकारचा वेगळाच माहोल तयार करून समाजाच्या मनात दहशत निर्माण करण्याचे ते एक ...

×