Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » संपुआच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झालेच नाहीत

संपुआच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झालेच नाहीत

=माजी डीजीएमओचा गौप्यस्फोट • कॉंग्रेसचा खोटारडेपणा उघड=
vinod-bhatia-ex-dgmoनवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] – संपुआच्या कार्यकाळातही गुलाम काश्मिरात धडक लष्करी कारवाई (सर्जिकल स्ट्राईक) करण्यात आली होती, हा माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा दावा लष्कराचे माजी महासंचालक (लष्करी कारवाई ) लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद भाटिया यांना खोडून काढला आहे.
गुलाम काश्मिरात यावेळी पहिल्यांदाच धडक लष्करी कारवाई झाली आहे, या आधी अशी कारवाई कधीच झाली नव्हती, असे विनोद भाटिया यांनी स्पष्ट केले आहे. २०१२ ते २०१४ या काळात म्हणजे संपुआच्या राजवटीत विनोद भाटिया महासंचालक (लष्करी कारवाई) होते. त्यामुळे त्यांच्या या खुलाशाला महत्त्व आहे. आपल्या या खुलाशाने भाटिया यांनी पी. चिदंबरम आणि कॉंग्रेसचा खोटारडेपणा उघड केला आहे. संपुआच्या कार्यकाळातही गुलाम काश्मिरात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता, मात्र ही माहिती आम्ही उघड केली नव्हती, असा दावा माजी गृहमंत्री असलेल्या पी. चिदंबरम यांनी नुकताच केला होता. चिदंबरम ज्या सर्जिकल स्ट्राईकचा दावा करतात, ती सर्जिकल स्ट्राईक नव्हती, तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कारवाई होती, असे स्पष्ट करत विनोद भाटिया म्हणाले की, पहिला सर्जिकल स्ट्राईक भारताने म्यानमारमध्ये केला होता. दुसरा सर्जिकल स्ट्राईक गुलाम काश्मिरात करण्यात आला.
गुलाम काश्मिरात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे महत्त्व वेगळे आहे, कारण तो पाकिस्तानविरुद्ध करण्यात आला. भारताने सर्व आघाड्यांवर पाकिस्तानवर मात केली आहे, मग ती राजकीय असो, मुत्सद्देगिरीची असो की लष्करी याकडे विनोद भाटिया यांनी लक्ष वेधले. यावेळी आम्ही गुलाम काशिमरात तीन किमी आतमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा करत त्यांचे प्रशिक्षण तळ उद्‌ध्वस्त केले. या कारवाईमुळे दहशतवाद्यांमध्ये दहशत निर्माण झाली असल्याचा दावाही विनोद भाटिया यांनी केला.
ही अतिशय उत्कृष्ट अशी लष्करी कारवाई होती. ही कारवाई करण्यापूर्वी सविस्तर माहिती गोळा करण्यात आली होती. या कारवाईला हिरवी झेंडी दाखवण्याचा निर्णय सर्वोच्च पातळीवरून घेण्यात आला. ही कारवाई अपयशी झाली असती तर आमची जगभर बदनामी झाली असती, असे स्पष्ट करत भाटिया म्हणाले की, आमच्या काळात सीमेवर घुसखोरी रोखण्यासाठी तसेच सीमेपलीकडून होणारा गोळीबार रोखण्यासाठी कारवाई करत होतो. पण त्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जात होता. पाकिस्तानने भारताविरुद्ध अप्रत्यक्ष युद्ध छेडले असून त्याची किंमत त्याला चुकवावी लागेल, असा इशाराही भाटिया यांनी यावेळी दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29351

Posted by on Oct 7 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (80 of 2477 articles)


=भारतीय लष्कराचा सरकारपुढे प्रस्ताव= नवी दिल्ली, [६ ऑक्टोबर] - गुलाम काश्मिरातील सर्जिकल ऑपरेशनमुळे आत्मविश्‍वास द्विगुणित झालेल्या लष्कराने पाकी दहशतवाद्यांचा कायमचा ...

×