संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून
Sunday, June 25th, 2017नवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जुलैपासून सुरू होणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज शनिवारी करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय कामकाजविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ जुलैपासून सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
१७ जुलैलाच राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत असल्यामुळे पहिल्या दिवशी अधिवेशनाचे कोणतेही कामकाज होण्याची शक्यता नाही. विनोद खन्ना या विद्यमान लोकसभा सदस्याचे तसेच पल्लवी रेड्डी या राज्यसभा सदस्याचे निधन झाल्यामुळे पहिल्या दिवशी या दोघांना श्रद्धांजली अर्पण करून दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित केले जाईल. जीएसटीचा शुभारंभ करण्यासाठी ३० जूनला मध्यरात्री संसदेच्या केंद्रीय कक्षात संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=34808

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!