Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » समुद्राच्या पाण्याचे पेयजल; चैतन्यचा अभूतपूर्व शोध

समुद्राच्या पाण्याचे पेयजल; चैतन्यचा अभूतपूर्व शोध

सॅन फ्रान्सिस्को, [६ फेब्रुवारी] – भारतीय वंशाच्या अमेरिकन विद्यार्थ्याने समुद्राचे खारे पाणी  पेयजलात रूपांतरित करण्याचा जगातील आजवरचा सर्वात स्वस्त आणि अद्‌भुत शोध लावला आहे.
या भारतीय संशोधकाचे नाव चैतन्य करमचेडू असे असून, काही महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला या संशोधनात यश आले आहे. उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचे लक्ष या युवा संशोधकाने वेधले आहे.
अमेरिकेच्या ओरेगन येथील पोर्टलँड शहरात राहणारा चैतन्य माध्यमिक शाळेत शिकत आहे. चैतन्यने केलेल्या विज्ञानाच्या एका प्रयोगाने अवघ्या देशाचे लक्ष त्याच्याकडे लागले आहे. त्याच्या या शोधामुळे आणखी एका भारतीयाने देशाचे नाव विदेशात मोठे करण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे.
जगाला बदलविणारी मोठी योजना माझ्याकडे आहे. प्रत्येक आठ व्यक्तींमागे एकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. ही एक गंभीर समस्या असून ती दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
पृथ्वीचा सुमारे ७० टक्के भाग समुद्राने व्यापला आहे. मात्र त्यात खारट पाणी आहे. हे पाणी पिण्यायोग्य बनविण्याचा उपाय खूपच महागडा आहे. हाच या मार्गातला मोठा अडथळा आहे, असे चैतन्यने सांगितले.
शोषून घेणार्‍या उच्च दर्जाच्या पॉलिमरसोबत मी हा प्रयोग केला. समुद्राच्या पाण्यातून मीठ काढून त्यापासून पेयजल बनविण्याची स्वस्त पद्धत मी शोधून काढली. शाळेतील जीवशास्त्राच्या शिक्षिका डॉ. लारा यांनी पद्धतीच्या तुलनेत ही पद्धत अत्यंत स्वस्त असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे ही पद्धत सर्वसामान्य व्यक्तीही वापरू शकतो असा दावा चैतन्यने केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29419

Posted by on Feb 7 2017. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या (66 of 2483 articles)


वृत्तसंस्था चेन्नई, ६ फेब्रुवारी - ‘सुपरस्टार’ रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. रजनीकांत यांनी ‘ताकद’ विषयावर केलेल्या ...

×