Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » सरकारचा एकच धर्म, पहिले भारत!

सरकारचा एकच धर्म, पहिले भारत!

  • संविधान बदलण्याचा विचारही कुणी करू शकत नाही
  • घटनेनुसारच चालणार देशाचा कारभार
  • लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

modi_in loksabhaनवी दिल्ली, [२७ नोव्हेंबर] – आपल्या सरकारचा एकच धर्म आहे आणि तो म्हणजे, ‘पहिले भारत’. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निर्मिती असलेली भारतीय राज्यघटना बदलविण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही, ती कुणीही बदलवू शकत नाही. कारण, संविधान बदलणे म्हणजे आत्महत्याच ठरेल, याची आम्हाला परिपूर्ण जाणीव आहे. आपले सरकार देशाचा कारभार घटनेनुसारच चालविणार आहे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी लोकसभेत केले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस भारतीय राज्यघटना आणि घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विशेष चर्चेसाठी राखून ठेवण्यात आले होते. यावर सलग दोन दिवस वादळी चर्चा झाल्यानंतर पंतप्रधानांनी आज चर्चेला उत्तर दिले. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, मतैक्य म्हणजे लोकशाहीची सर्वोच्च शक्ती आहे. सहकार्यातून तिला आणखी बळकटी मिळत असते. बहुसंख्यक किंवा अल्पसंख्यकांच्या मतातून लोकशाही बळकट होत नसते.
यावेळी मोदी यांनी संसदेतील चर्चेच्या काळात विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे स्वीकारण्याचे धाडस दाखविणारे देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची स्तूती केली. सोबतच, भारतीय राज्य घटनेवर आपले मत व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधानांनी कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांचेही अभिनंदन केले.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशाच्या घटनेने समाजातील प्रत्येक घटकाला, प्रत्येक नागरिकाला अधिकार दिले आहेत. त्यामुळे या राज्यघटनेचे पावित्र्य अबाधित राखणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. घटनेवर संसदेत अतिशय सृदृढ चर्चा झाली. पण, या चर्चेचा मुख्य मुद्दा मी किंवा माझा नसून, ‘आपला’ असा आहे. घटनेवरील चर्चेत गोडी दाखवून सहभागी झाल्याबद्दल मोदी यांनी सर्वच सदस्यांचे आभार मानले.
काही लोकांना असे वाटत होते की, पंतप्रधान आपल्या भाषणाच्या शेवटी सर्वच मुद्यांचा खुलासा करतील. पण, मी केवळ माझे मत व्यक्त करणार आहे. इतर नेत्यांनी राज्य घटनेवर जे मत व्यक्त केले, तसेच मी देखील व्यक्त करणार आहो, असे सांगताना पंतप्रधानांनी यावेळी संविधानावर गुरुवारी आपले मत रोखठोकपणे व्यक्त केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मला विश्‍वास आहे की, तुमचे भाषण संसदेच्या इतिहासातील सर्वात अमूल्य आणि प्रेरणात्मक दस्तावेज सिद्ध होतील. यासाठी मी तुमचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान म्हणाले.
२६ नोव्हेंबर आपण संविधान दिवस म्हणून साजरा करीत असलो, तरी त्यामुळे २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व मुळीच कमी होणार नाही. आपली घटना भारतीयांच्या सन्मानाचेआणि भारताच्या ऐक्याचे प्रतीक आहे. असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25792

Posted by on Nov 28 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1136 of 2477 articles)


=मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप सरकारने फेटाळला= नवी दिल्ली, [२७ नोव्हेंबर] - राज्य घटनेत फेरबदल कराल, तर देशात रक्तपात होईल, अशी ...

×