Home » छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण » सलमानच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती

सलमानच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती

  • ३० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन
  • परवानगी शिवाय विदेशात जाण्यावर बंदी
  • पासपोर्ट जप्त
  • १५ जूनला होणार पुढील सुनावणी

salman bailमुंबई, [८ मे] – बॉलीवूडमधील ‘दबंग’ अशी ओळख असलेल्या सलमान खानला ‘हिट ऍण्ड रन’ प्रकरणी दिवाणी व सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या पाच वर्षाच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी अखेर स्थगिती दिली आणि सलमानला ३० हजाराच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे सलमानची तुरुंगवारी तूर्तास लांबणीवर पडली आहे.
६ मे रोजी दिवाणी व सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या निर्णयाला आव्हान देणारी सलमान खानची याचिका उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ठिपसे यांनी दाखल करून घेतली. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर सलमानला उच्च न्यायालयाने दोन दिवसांचा जामीन दिला होता. जामिनाची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी सलमानच्या अर्जावर आज शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. सलमानच्या वतीने ऍड्. अमित देसाई यांनी प्रभावी युक्तिवाद केला. यावेळी देसाई यांनी जवळजवळ सार्‍याच विषयावर आपला आक्षेप नोंदवला. सरकारी वकिलांच्या तुलनेत त्यांचा युक्तिवाद अधिक प्रभावी ठरला. त्यामुळे उच्च न्यायालयाने सलमानच्या शिक्षेला पूर्ण स्थगिती दिली. पण, सलमान खानला पुन्हा एकदा सत्र न्यायालयासमोर शरण जाण्याचे आणि नव्या ३० हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सलमानने संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास पुन्हा सत्र न्यायालयात हजेरी लावून, ‘कॅश बॉन्ड’ भरून जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली आणि जातमुचलक्यासाठी अवधी मागितला. न्यायालयाने यासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे.
यावेळी न्या. ठिपसे यांनी सलमानचा पासपोर्ट जप्त करण्याचे व न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश न सोडण्याचे आदेशही दिले. या प्रकरणी पुढील निर्णय १५ जून रोजी घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. सुनावणीच्या वेळी कॉंग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांच्यासह सलमानची बहीण अलवीरा न्यायालयात हजर होती.
चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सलमान खानच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायालयाबाहेर सलमानच्या एका चाहत्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सलमानला अटक झालेली मी बघू शकत नाही, असे म्हणत सलमानच्या चाहत्याने न्यायालयाच्या आवारातच विषारी पदार्थ प्राशन केला. हा प्रकार वेळीच पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सलमानसाठी आपल्या जिवाचीही पर्वा न करणार्‍या या चाहत्याचे नाव गौरांग कुंडू आहे. गौरांग हा एक स्ट्रगलिंग लेखक असून, सलमानने त्याला मदत केली होती. त्यामुळे सलमानचे आपल्यावर उपकार आहेत. त्याला होणारी शिक्षा मला द्या, पण सलमानला शिक्षा करू नका, असे पत्र त्याने लिहिले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22454

Posted by on May 9 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1721 of 2476 articles)


=हुजूर पक्ष बहुमताजवळ= लंडन, [८ मे] - ब्रिटनवासियांनी पुन्हा एकदा विद्यमान पंतप्रधान डेव्हीड कॅमरून यांच्या हुजूर पक्षावरच विश्‍वास व्यक्त केला ...

×