Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सुफी संमेलनात भारत मातेचा जयजयकार

सुफी संमेलनात भारत मातेचा जयजयकार

=आतंकवाद व धर्माची सांगड नको : मोदी=

नवी दिल्ली, [१७ मार्च] – चहुबाजूने हिंसेचा अंध:कार दाटून येत असताना सुफी पंथ हा एखाद्या प्रकाशकिरणासारखा दिशा दाखवून विश्‍वास वाढवत असल्याने, आतंकवाद व धर्म यांची एकदुसर्‍यांशी सांगड न घालण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. तथापि, हे संमेलन गाजले ते जगभरातून आलेल्या सुफी पंथीयांनी केलेल्या भारत मातेच्या जयजयकाराने.
वर्ल्ड इस्लामिक सुफी फोरमतर्फे येथे गुरुवारपासून आयोजित संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान बोलत होते. आतंकवादाचा उद्देशच आपल्यात फूट पाडण्याचा असून, त्याविरोधातच आपल्याला एकजूट दाखवणे जरुरी झाले आहे, याकडेही मोदी यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींनी नरेंद्र मोदी यांच्या भाषणापूर्वी ‘भारत माता की जय’चे नारे देऊन परिसर दणाणून टाकला.
जगातील वाढत्या हिंसाचाराचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, संमेलनात सहभागी झालेले आपण वेगवेगळ्या देशांतून आला आहात. आपली भाषाही वेगवेगळी आहे. मात्र आपला उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे जगात शांतता, बंधुभावाचा संदेश देणे. शांततेसाठी भारताच्या योगदानाचा उल्लेख करून ते पुढे म्हणाले की, भारत डोक्यापासून ते पायापर्यंत शांतता आणि सौहार्द यांचा प्रतीक आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्‍चन, जैन आणि बौद्ध या धर्मांना मानणारे आणि न मानणारे या देशाचे अभिन्न अंग आहेत. त्यामुळेच शांती आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या भूमीत मी आपले स्वागत करीत आहे.
जगाला सुफीवाद ही इस्लामकडून मिळालेली मोठी देणगी असल्याचे सांगून, इस्लामचा अर्थच शांती आणि सुफीवाद शांतीचा आवाज असल्याचे त्यांनी सांगितले. अल्लाह या नावाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की आपण जेव्हा अल्लाहच्या ९९ नावांची महती गातो तेव्हा त्यातील कोणतेही नाव हिंसेचे समर्थन करीत नाही. मानवतेवर जो प्रेम करतो तोच भगवंताला प्रिय असतो, असे हजरत निजामुद्दीन यांनी म्हटले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
२० मार्चपर्यंत चालणार्‍या या संमेलनात पाकिस्तान, इराण, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा यांसह २० देशांतील २०० हून अधिक अध्यात्मिक नेते, विद्वान, शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले आहेत.
जगात पसरणार्‍या अतिरेकी विचारांचा मुकाबला करण्यासाठी सुफींच्या भूमिकेवर या संमेलनात चर्चा होणार असून त्यासाठी विविध पर्यायांचाही शोध घेतला जाणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27420

Posted by on Mar 18 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (625 of 2477 articles)


मुख्यमंत्र्यांचा निर्धार कर्जमाफी रामबाण उपाय नाही कृषी विकासाला नवसंजीवनी २०१९ पर्यंत महाप्रकल्प पूर्ण करणार शिवस्मारक ४० महिन्यांत साकारेल मुंबई, ...

×