Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, फिचर, राष्ट्रीय » स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे

स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे

=ब्रिटिश वैमानिक ट्रेसी टेलर यांचा विश्‍वास=
Tracey-Taylorनवी दिल्ली, [२७ नोव्हेंबर] – स्त्री, मग ती कोणत्याही क्षेत्रात काम करणारी असो, आपल्या उराशी बाळगलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मारलेल्या तिच्या भरारीकरीता आकाश देखील ठेंगणे आहे, असा विश्‍वास ब्रिटिश वैमानिक ट्रेसी टेलर यांनी आज वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.
केवळ ३ महिन्यांच्या अ़वधीत युके ते ऑस्ट्रेलिया या १३००० मैलांच्या विमान प्रवासाच्या मोहीमेस त्या निघाल्या आहेत. यादरम्यान तब्बल २३ देशांवरून त्या विमानाद्वारे भरारी मारतील. हा संपूर्ण प्रवास बोईंग कंपनीच्या ओपन कॉकपिट बायप्लेनद्वारे त्या करीत आहेत. यापूर्वी सर्वप्रथम हा विक्रम करणार्‍या पहिल्या महिला वैमानिक ऍमी जॉन्सन यांचे अनुकरण आपल्याला करायचे नसून, या मोहीमेद्वारे जगभरातील तरुण महिला वैमानिकांनाही या क्षेत्रात भरार्‍या मारण्यासाठी आपल्याला प्रेरणा द्यायची आहे, असे त्यांनी येथे सांगितले.
विमानउड्डाण क्षेत्रातील आजवर यशस्वी झालेल्या महिलांचे यश साजरे करणे हाच माझ्या मोहीमेचा खरा उद्देश असून, त्याचबरोबर अभियांत्रिकी व याअंतर्गत येणार्‍या अन्य क्षेत्रातील महिलांच्या यशाला देखील सलाम करण्याचा या मोहीमेचा हेतू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
१९३० साली एक रिस्टोअर्ड ओपन कॉकपिट १९४२ बोईंग स्टीअरमॅन संपूर्णतः एकट्याने उडवत साहसी प्रवासाची मोहीम यशस्वी करणार्‍या ऍमी जॉन्सन या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या. ब्रिटन ते ऑस्ट्रेलिया हा प्रवास तेव्हा यशस्वी करत त्यांनी आज आपण वापरत असलेला हा आकाश मार्ग सर्वांकरीता खुला करून दिला.
‘ऍमी या माझे प्रेरणास्थान आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दिशेने उड्डाण करताना त्यांच्या गाठीशी फार कमी अनुभव असल्यानेच अखेरीस त्यांचे विमान कोसळले. त्यांच्या या साहसी प्रवासाची कथा आजच्या काळाशी साधर्म्य सांगणारी आहे. त्यामुळेच मला त्यांची कथा जगातील सर्व तरुणींना सांगायची आहे’, असे ट्रेसी यांनी आवर्जून सांगितले.
२३ नोव्हेंबरला ट्रेसी व त्यांचा चमू भारतात अहमदाबाद आणि जयपूर येथे पोचला. आग्रा, वाराणसी अशा भारतातल्या एकूण सात शहरात ही मंडळी थांबणार आहेत.
८५ वर्षांपूर्वी ऍमी जॉन्सन यांनी केलेल्या साहसी विमान प्रवासाशी ट्रेलर यांची ही श्रद्धांजलीपर विमान यात्रा साधर्म्य सांगत असून, एकूण १४००० मैलांचा हा विमान प्रवास आहे. या प्रवासात ५० ठिकाणी इंधन भरण्याकरीता थांबावे लागणार आहे.
‘या सगळ्याची सुरुवात २००३ मध्ये झाली. त्यावेळी मी आर्टेमिसच्या माझ्या व्हिन्टेज बायप्लेन स्पिरीटने आफ्रिकेच्या दिशेने उड्डाण केले होते. ते माझे उड्डाण म्हणजे अल्पपरिचित अशा मेरी हीथ यांच्या विमानप्रवासाच्या यशाला सलामी होती. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे माझे प्रेरणास्थान असलेल्या ऍमी जॉन्सन यांचे यश साजरे करणे होय’ असे त्यांनी सांगितले.
जागतिक विमान वाहतूक अभियांत्रिकी क्षेत्राचे महत्त्व सांगताना, ५३ वर्षीय महिला वैमानिक टेलर यांनी आपला जीवन प्रवास नक्कीच अनेक तरुणींना प्रेरणादायी ठरेल, असा विश्‍वासही यावेळी व्यक्त केला. जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात आज घडीला अभियांत्रिकी अंगाने विकास होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने एअरोस्पेस क्षेत्र झपाट्याने विकसित होत असल्याचेही त्या म्हणाल्या. या क्षेत्रात महिलांकरीता करीअरच्या संधी इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत, ज्याची त्यांना माहितीही नाही. त्यामुळेच केवळ अभियांत्रिकी क्षेत्राचा विचार करून अनेक महिला हा पर्याय बंद करतात. मात्र त्याहीपेक्षा अनेक मोठ्या संधी या क्षेत्रांतर्गत उपलब्ध आहेत असे टेलर यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25782

Posted by on Nov 28 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, फिचर, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, फिचर, राष्ट्रीय (1139 of 2478 articles)


आग्रा, [२७ नोव्हेंबर] - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची लहान बहिण कमला दीक्षित यांचे गुरुवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास आग्रा येथे ...

×