Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, ७१७ ठार

हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, ७१७ ठार

  •  ७१७ ठार, ८६० जखमी
  • २५ वर्षांतील भीषण दुर्घटना
  • मृतांमध्ये एक भारतीय

haj-yatra 700 deadमिना, [२४ सप्टेंबर] – जगभरातील मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या सौदी अरेबियातील मक्का येथे क्रेन कोसळून शंभरावर भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज गुरुवारी मक्का येथून जवळच असलेल्या मिना येथील हजदरम्यान भीषण चेंगराचेंगरी होऊन ७१७ जणांचा मृत्यू झाला असून, इतर ८६० जण जखमी झाले. मृतांमध्ये एक आणि जखमींमध्ये दोन भारतीयांचा समावेश आहे. हज यात्रेदरम्यान सौदी अरेबियात घडलेली ही गेल्या २५ वर्षांतील सर्वांत भीषण दुर्घटना आहे. यापूर्वी जुलै १९९० मध्ये मक्काजवळील बोगद्यात १४२६ भाविकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेंगराचेंगरीच्या या घटनेत मोठ्या संख्येत भाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मक्केत शैतानाला दगड मारण्याच्या परंपरेदरम्यान मिना येथील रस्ता क्रमांक २०४ वर अचानक मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने ही चेंगराचेंगरी झाली. दीड लाख भारतीयांसह जगभरातील सुमारे २० लाख भाविक यावर्षी हज यात्रा करत आहेत. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांमध्ये आसामातील दोन भारतीयांचाही समावेश आहे, अशी माहिती जेद्दाह येथील भारतीय कॉन्सुलेटमधील अधिकार्‍यांनी दिली. या दुर्घटनेत वेगवेगळ्या देशांच्या ७१७ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती सौदीच्या नागरी संरक्षण संस्थेकडून देण्यात आली. ११ दिवसांपूर्वी मक्का येथील मशिदीत क्रेन कोसळून ११ भारतीयांसह ११५ जणांचा मृत्यू झाला होता. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मिना येथे मदत आणि बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ज्याठिकाणी शैतानाला दगड मारले जातात तिथे ही घटना घडली नसून, रस्ता क्रमांक २०४ वरील जमारत पुलाजवळ गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली. दोन वैद्यकीय पथकं घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. वैद्यकीय पथकात सुमारे चार हजार कर्मचारी आणि २२० रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्यात आल्या आहेत.
मिना येथे चेंगराचेंगरीच्या घटना नव्या नसून, २००६ साली झालेल्या चेंगराचेंगरीत ५१ भारतीयांसह ३६४ भाविकांचा मृत्यू झाला होता. आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मुस्लिमाने आपल्या जीवनात एकदातरी हज यात्रा केली पाहिजे, अशी श्रद्धा आहे.
पंतप्रधानांना दु:ख
मिना येथील चेंगराचेंगरीत मोठ्या प्रमाणात भाविकांचा मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मक्का येथून मन हेलावून टाकणारे वृत्त आले. मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=24037

Posted by on Sep 25 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या (1424 of 2483 articles)


=नेताजींचे नातू चंद्रकुमार बोस यांची मागणी= नवी दिल्ली, [२४ सप्टेंबर] - पश्‍चिम बंगाल सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ ...

×