Home » गुजरात, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » १३८ व्या जगन्नाथ रथयात्रेला थाटात प्रारंभ

१३८ व्या जगन्नाथ रथयात्रेला थाटात प्रारंभ

=मुख्यमंत्री आनंदीबेन यांनी केली रस्त्याची सफाई, मंगलारतीत अमित शहांची उपस्थिती=
anandiben-patel-rathayatraअहमदाबाद, [१८ जुलै] – भगवान जगन्नाथाच्या १३८ व्या रथयात्रेला आज शनिवारी गुजरातच्या अहमदाबाद शहरात प्रचंड उत्साहात प्रारंभ झाला. शहराच्या जमालपूर भागातील ४०० वर्षे जुन्या जगन्नाथाच्या मंदिरातून सकाळी रथयात्रा सुरू झाली, तेव्हा भाविकांच्या गर्दीने शहर फुलले होते.
विशेष म्हणजे, ईद आणि जगन्नाथाची रथयात्रा एकत्रच येण्याचा योग ३० वर्षांनंतर आज शनिवारी प्रथमच आला आहे. यामुळे या शहरात ईद आणि रथयात्रा असा दुहेरी उत्सव साजरा करण्यात येत आहे. कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अहमदाबादसोबतच बडोदा, सूरत, राजकोट, आणंद, भावनगर, गांधीनगर आणि जुनागढ येथूनही रथयात्रा निघाल्या आहेत. अहमदाबादसोबतच राज्याच्या अन्य भागात हिंदू आणि मुस्लिमांनी परस्परांना ईद व जगन्नाथ रथयात्रेच्या मिठाई वाटून शुभेच्छा दिल्या.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी रथयात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी रस्त्याची स्वच्छता करण्याचा धार्मिक विधी पार पाडला. यानंतर भगवान जगन्नाथ, भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या छडींची थाटात मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी, सकाळी मंदिरात झालेल्या महाआरतीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह प्रामुख्याने उपस्थित होते. शहरातील १४ किलोमीटरच्या मार्गावरून रथयात्रा काढण्यात आली, तेव्हा लाखो भाविकांनी दर्शन घेतले. या रथयात्रेत १८ हत्ती, १०० ट्रक, ३० दिड्यांचा समावेश होता. रथयात्रेत सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून साधूसंत मोठ्या संख्येत येथे आले आहेत. रथयात्रेच्या मार्गावर १२ जिल्ह्यातून मागविण्यात आलेले २० हजार पोलिस तैनात करण्यात आले. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमधूनही पोलिस नजर ठेवून आहेत. याशिवाय, हेलिकॉप्टरमधूनही टेहळणी करण्यात येत आहे. या काळात गुजरातमध्ये एकूण ९७ रथयात्रा आणि ४९ शोभायात्रा निघणार असल्याने पोलिसांची ही जादा कुमक मागविण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23444

Posted by on Jul 19 2015. Filed under गुजरात, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in गुजरात, छायादालन, ठळक बातम्या, राज्य (1557 of 2477 articles)


नाशिक, [१४ जुलै] - नाशिकमध्ये १२ वर्षांनी कुंभमेळ्याच्या पावन पर्वाला सुरूवात झाली आहे. आज मंगळवार पहाटे ६ वाजून १६ मिनिटांच्या ...

×