Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » १९४५ नंतरही सुभाषचंद्र बोस जिवंत होते!

१९४५ नंतरही सुभाषचंद्र बोस जिवंत होते!

  • नेताजींशी संबंधित ६४ फाईल्स सार्वजनिक
  • गुप्त पाळतही ठेवली जात होती
  • आणखी रहस्य उलगडण्याची शक्यता

netaji subhashchandra bose1कोलकाता, [१८ सप्टेंबर] – पश्‍चिम बंगालमध्ये सत्तारूढ ममता बॅनर्जी सरकारने आज शुक्रवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ गोपनीय फाईल्स सार्वजनिक केल्या आहेत. नेताजी १९४५ नंतरही जिवंतच होते. शिवाय, त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांवर गुप्त पाळत ठेवली जात होती, असे धक्कादायक वास्तव या फाईल्समधून समोर आले आहे. नेताजींविषयी आणखीही काही रहस्याचा उलगडा होण्याचीही शक्यता आता बळावली आहे.
आपल्या सरकारच्या कस्टडीत जितक्या फाईल्स होत्या, त्यातील काही फाईल्स मी चाळलेल्या आहेत. यातील माहितीच्या आधारावर मी एवढे सांगू शकते की, १९४५ नंतरही नेताजी जिवंतच होते. नेताजी आणि त्यांच्या कटुंबात जो पत्रव्यवहार व्हायचा, तोदेखील बाहेर वाचला जायचा. शिवाय, त्यांच्यासोबतच कुटुंबातील अन्य सदस्यांवरही सातत्याने पाळत असायची, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पश्‍चिम बंगाल सरकारजवळ असलेल्या या सर्व फाईल्स १९३७ ते १९४७ या दरम्यान तयार करण्यात आलेल्या आहेत. नेताजींच्या अचानक बेपत्ता होण्यामागे नेमके काय कारण आहे, हे अद्यापही उलगडले नाही. यातील संभ्रम दूर करण्यासाठी या फाईलींचा उपयोग होऊ शकतो. या फाईल्स कोलकाता पोलिसांच्या अतिशय कडेकोट सुरक्षा असलेल्या संग्रहालयात ठेवण्यात आल्या असून, आता त्या कुणालाही पाहता येणार आहेत, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्राने दिली. दरम्यान, आता केंद्र सरकारनेही त्यांच्याकडील गोपनीय फाईल्स सार्वजनिक कराव्या, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. नेताजींबद्दल नेमके काय झाले होते, हे जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे. त्यांच्यासाठी आम्ही आमच्याकडील सर्व फाईल्स सार्वजनिक केल्या आहेत. आजचा दिवस खरोखरच ऐतिहासिक आहे, असेही त्या म्हणाल्या.
या फाईल्स संग्रहालयात ठेवण्यासाठी आयोजित समारंभात शहराचे पोलिस आयुक्त सुरजित कार पुराकायस्थ आणि नेताजींच्या कुटुंबातील काही सदस्य उपस्थित होते. यावेळी पोलिस आयुक्तांनी फाईल्सची डिजिटल स्वरूपातील सीडी नेताजींच्या कुटुंबातील सदस्यांना दिली. या ६४ फाईल्सपैकी ५५ फाईल्स कोलकाता पोलिसांच्या आणि उर्वरित नऊ फाईल्स राज्य पोलिसांच्या कस्टडीत होत्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23901

Posted by on Sep 19 2015. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1450 of 2477 articles)


=नॅशनल हेराल्ड प्रकरण, ईडीच्या निर्णयाने खळबळ= नवी दिल्ली, [१८ सप्टेंबर] - साक्षीदारांच्या अभावामुळे गुंडाळण्यात आलेली बहुचर्चित नॅशनल हेराल्ड प्रकरणाची चौकशी ...

×