Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » २०१५-१६अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

२०१५-१६अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये

INDIA-ECONOMY-POLITICS-BUDGET– आरोग्य विमा प्रीमिअममधील सवलतीची मर्यादा १५ हजारांवरून २५ हजारांपर्यंत
– वृद्धांना ही सवलत ३० हजारापर्यंत
– पान मसाला, सिगारेट, तंबाखू महाग होणार
– वाहतूक भत्ता ८०० वरून १६०० रुपये
– आयकरांतर्गत योगाचा धर्मदाय ट्रस्टमध्ये समावेश
– ‘गार’ची अंमलबजावणी आणखी दोन वर्षे लांबणीवर
– करातील सवलतींमध्ये सुसूत्रता आणणार
– पेन्शन फंडमधील सवलतीची मर्यादा एक लाखावरून दीड लाख रुपये
– सेवा कर वाढला … १२.३६ वरून १४ टक्के…बाहेरचे जेवण महाग होणार
– केंद्रीय अबकारी कर आता १२.५ टक्के
– स्वच्छ भारत कोषात देणगी शंभर टक्के करमुक्त
– एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्नावर दोन टक्के अधिभार, दहा कोटींपर्यंत सात टक्के
– एक लाख कोटींच्या गुंतवणुकीने पाच मोठे ऊर्जा प्रकल्प सुरू करणार
– संपत्ती कर संपुष्टात, दोन टक्के अधिभाराचा प्रस्ताव
– २२ आयातीत वस्तूंवरील शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव
– आयटी रिटर्नमध्ये नमूद करावी लागेल विदेशातील संपत्ती
– आयकराच्या रचनेत कुठलाही बदल नाही
– एक लाखापेक्षा जास्तीच्या व्यवहारासाठी पॅन आवश्यक
– शिक्षण क्षेत्रात ६८ हजार कोटी
– आरोग्याकरिता ३३,१५० कोटी
– शहरी आवास विकासासाठी २२,४०७ कोटी
– आर्थिक विकासात राज्ये समान भागीदार
– कंपनी कर कमी होणार… चार वर्षात ३० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणणार
– करचोरी रोखण्यासाठी मजबूत कायदा तयार करणार
– काळ्या पैशाची माहिती लपविणार्‍यांना दहा वर्षांचा कारावास
– संरक्षण क्षेत्राकरिता २,४६,७२७ कोटींची तरतूद
– पायाभूत क्षेत्रात ७० हजार कोटींची गुंतवणूक
– पंतप्रधान जीवनज्योती योजना सुरू करण्यात येईल
– पीएम विद्यालक्ष्मी योजनेत गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज
– करमुक्त इन्फास्ट्रक्चर बॉण्ड आणण्याची घोषणा
– संशोधन विकासाकरिता १५० कोटी
– थेट कर प्रणाली लागू करण्याची योजना
– पुढील वर्षी सातव्या वेतन आयोगाची शिफारस लागू करणार
– तांत्रिक उद्योगांसाठी सेतू योजना
– अशोक चक्रासह सोन्याचे नाणे जारी होणार
– इपीएफमध्ये कर्मचार्‍यांसाठी पर्याय राहणार
– निर्भया फंड दुप्पट करणार
– राष्ट्रीय कौशल्य मिशन सुरू करणार
– दीनदयाल युवा योजनेत १,५०० कोटी
– भारतात ५४ टक्के लोक युवा
– २० हजार गावांमध्ये वीज पोहोचविण्यावर भर
– ८० हजार सीनिअर सेकंडरी स्कूल सुरू करण्याचे लक्ष्य
– सुवर्ण खाते सुरू करणार, त्यावर व्याज देण्याची तरतूद
– जम्मू-काश्मीर, आसाम, पंजाब, आंध्रप्रदेश, तामिळनाडूत एम्ससारख्या संस्था
– बिहार, प. बंगालला विशेष आर्थिक मदतीची घोषणा
– नमामी गंगा योजनेकरिता ४ हजार ७१ कोटी
– आयएसएम धनबादला आयआयटीचा दर्जा
– कर्नाटकातही सुरू करणार आयआयटी
– पुढील वर्षापासून जीएसटीवर विशेष भर देणार
– विदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्याने पुढाकार घेणार
– ग्रामीण युवकांना रोजगार देण्यासाठी नवी योजना
– काळा पैसा रोखण्यासाठी रोख व्यवहार कमी करणार
– डेबिट, क्रेडिट कार्डच्या व्यवहाराला प्राधान्य
– व्यवसाय सुरू करण्यास मंजुरी देण्यासाठी वेगळी समिती
– डायरेक्ट टॅक्स कोड लवकरच लागू होणार
– १५० देशांसाठी आगमन होताच व्हिसा योजना
– वाराणसी-अमृतसर येथील सांस्कृतिक वारसा जतन करून जागतिक दर्जाचा करणार
– २५ हेरिटेज साईटस्ला नवे रूप देणार
– ग्रामीण पत निधीसाठी १५ हजार कोटी
– रेल्वेकरिता १० हजार कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद
– मनरेगाकरिता ३४,६९९ कोटी, पाच हजार कोटी वाढविले
– प्रत्येक गावांत रुग्णालय
– शेतकर्‍यांरी कर्जासाठी ८.५ लाख कोटी रुपये… राष्ट्रीय बाजारपेठही तयार करू
– सूक्ष्म सिंचनाकरिता ५३०० कोटी
– लघू उद्योजकांकरिता २० हजार कोटी
– जनधन योजनेत आता दोन लाखांचा अपघात विमा, प्रत्येक नागरिकाला मिळणार विमा सुरक्षा
– १२ रुपयांच्या वार्षिक प्रीमिअमवर दोन लाखांचा विमा
– जनधन योजनेत ६० वर्षांनंतर पेन्शनची तरतूद
– जनधन योजनेला टपाल कार्यालयाशी जोडण्याची योजना
– बीपीएल वृद्धांसाठी अटल पेन्शन योजना सुरू करणार
– पाच वर्षांपर्यंत एक हजार लोकांकडून, एक हजार सरकारकडून
– अटल नवोन्मेश मिशनची घोषणा… १५० कोटींची तरतूद
– जास्त उत्पन्न असलेल्यांनी स्वत:च सबसिडी घेणे बंद करावे
सबसिडी संपुष्टात आणणार नाही, कमी करण्यावर भर देणार
सबसिडीची गरज केवळ गरिबांनाच आहे
– २०१७-१८ पर्यंत वित्तीय तूट तीन टक्क्यांवर आणणार
अल्पसंख्यकांसाठी नई मंजिल योजना, ३७३८ कोटींची तरतूद
– सहा कोटी शौचालयांचे सरकारचे उद्दिष्ट
– नीती आयोगाला एक हजार कोटी रुपये
– मेक इन इंडिया मिशनमध्ये रोजगार वाढविण्यावर भर
– गावांमध्ये चार कोटी घरांच्या बोंधणीचा प्रस्ताव
– एक लाख किमीचे रस्ते बनविण्याची गरज
– प्रत्येक गावाला दूरसंचार नेटवर्कशी जोडणार
– गावांच्या विकासाकरिता कृषीचा विकास करणार
…….
गैर योजना खर्च १३.१२ लाख कोटी
योजना खर्च ४.६५ लाख कोटी
विविध करांमधून मिळणार १४.४९ लाख कोटींचे उत्पन्न
थेट कर प्रस्तावांमुळे ८३१५ कोटींचे नुकसान होणार, तर अप्रत्यक्ष कर प्रस्तावांमुळे २३ हजार कोटींचा फायदा
नव्या कर प्रस्तावांमुळे १५,०६८ कोटींचा महसूल मिळणार

या गोष्टी होणार महाग…
तंबाखू
सिगारेट
गुटखा
मद्य
लॉटरी
घर खरेदी
हॉटेल बिल
आयातीत व्यावसायिक वाहने
सिमेंट
शीतपेय आणि बाटलीबंद पाणी
प्लास्टिक बॅग
रुग्णालयाचा खर्च
जाहिराती
बँकिंग सेवा आणि इतर वित्तीय सेवा
क्रेडिट आणि डेबिट खर्च
साफ-सफाई खर्च
इंटरनेट कॅफे
पॅकेजिंग
टपाल सेवा
पर्यटन सेवा
फोन बिल
वीज बिल
उच्च श्रेणीचा विमान प्रवास
ऍम्युझमेंट आणि थीम पार्कमध्ये जाणे
संगीत उपकरणे

या गोष्टी होणार स्वस्त
एक हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची चामड्याची पादत्राणे
स्वदेशी बनावटीचा मोबाईल फोन
एलईडी, एलसीडी, एलईडी लाईट व लॅम्प
सौर ऊर्जेवर चालणारे वॉटर हिटर
पेसमेकर्स, रुग्णवाहिका सेवा
संगणक टेबल
अगरबत्ती
मायक्रोव्हेव ओव्हन
रेफ्रिजरेटर कम्प्रेसर
पीनट बटर, पॅकबंद फळे आणि भाजीपाला
संग्रहालय, प्राणीसंग्रहालय आणि राष्ट्रीय उद्यानात फिरणे

Short URL: https://vrittabharati.in/?p=20994

Posted by on Mar 1 2015. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2003 of 2477 articles)


=देशातील टांकसाळीतच घडणार नाणी= नवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] - सोन्याच्या आयातीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या सर्वाधिक सोन्याची नाणी विदेशातून ...

×