Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » २०१८ पर्यंत प्रशस्त होणार राममंदिर निर्माणाचा मार्ग

२०१८ पर्यंत प्रशस्त होणार राममंदिर निर्माणाचा मार्ग

-• विहिंपचे डॉ. सुरेंद्र जैन यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, ८ सप्टेंबर –
अयोध्येतील राममंदिराबाबत २०१८ पयर्र्ंत निर्णायक तोडगा निघालेला असेल, असे विहिंपचे आंतरराष्ट्रीय संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन यांनी आज सांगितले. राम मंदिर हा देशातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा प्रश्‍न असल्यामुळे अयोध्येत राम मंदिर होईस्तोवर विहिंप स्वस्थ बसणार नाही, असे जैन यांनी स्पष्ट केले.
नॉर्थ ऍव्हेन्युस्थित विहिंप कार्यालयात पत्रकारांनी बोलताना डॉ. जैन म्हणाले की, २०१८ पर्यंत राममंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त झालेला असेल. हा मार्ग कसा प्रशस्त होणार हे आजच सांगता येत नसेल तरी त्यासाठी अनेक पर्यायांवर काम सुरू आहे. त्यात संसदेत कायदा करून या मुद्यावर तोडगा काढण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. राम मंदिराच्या मुद्यावर न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली असली तरी न्यायालयाबाहेर या मुद्यावर तोडगा निघण्याची कोणतीच शक्यता नाही, याकडे लक्ष वेधत डॉ. जैन म्हणाले की, राममंदिराच्या मुद्यावर चर्चा करून तोडगा काढण्याची मुस्लिमांमधील एका गटाची तयारी नसल्यामुळे चर्चा आणि सल्लामसलत कोणाशी करावी, हा आमच्या समोरचा प्रश्‍न आहे. त्यामुळे सरकारने संसदेत कायदा करून राम मंदिराच्या मुद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.
राममंदिराच्या मुद्यावर न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला तर मंदिराची जागा सोडून उर्वरित जागेत मशिद बांधण्याची आणि मुस्लिमांच्या बाजूने निर्णय दिला तर मशिदी बांधण्याची जागा सोडून उर्वरित जागेवर मंदिर बांधण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी आला होता, मात्र आम्हाला तो मान्य नव्हता, अयोध्येच्या रामजन्मभूमीवर आम्हाला फक्त मंदिरच हवे आहे, असे डॉ. जैन यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानकडून आर्थिक मदत मिळत असल्यामुळे सुन्नी लोक राम मंदिर मुद्यावर तोडगा निघू देत नाही, असा आरोप शिया पंथाने केला आहे, याकडे लक्ष वेधले असता, पाकिस्तानकडून सुन्नी पंथाला मिळणार्‍या आर्थिक मदतीची चौकशी करण्याची मागणी डॉ. जैन यांनी केली. (तभा वृत्तसेवा)

Short URL: https://vrittabharati.in/?p=34923

Posted by on Sep 9 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (26 of 2477 articles)


-अन्यथा कार कंपन्यांवर कारवाई -•नितीन गडकरी यांचा इशारा, नवी दिल्ली, ८ सप्टेंबर - पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्‍या गाड्यांची निर्मिती करण्याऐवजी ...

×