Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » २०१९ पर्यंत जलवाहतूक वाढवण्याचा सरकारचा मानस

२०१९ पर्यंत जलवाहतूक वाढवण्याचा सरकारचा मानस

=असोचॅमच्या जलवाहतूक परिषदेमध्ये नितीन गडकरी यांचे प्रतिपादन=
assocham_STATES_COAST nitin gadkariमुंबई, [१३ जानेवारी] – समुद्रीय नौकावहन आणि आंतरदेशीय जलवाहतूक विकास याला रालोआ सरकारने प्राथमिकता दिली असून २०१९ पर्यंत माल आणि प्रवासी जलवाहतूक १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती केंद्रीय नौकावहन मंत्री नितीन गडकरी यांनी दली आहे.
असोचॅमने बुधवारी येथे आयोजित केलेल्या किनारपट्टी नौकावहन आणि आंतरदेशीय जलवाहतूक परिषदेमध्ये ते बोलत होते.
गडकरी पुढे म्हणाले की, चीन, दक्षिण कोरिया, संयुक्त राष्ट्रसंघ, जर्मनी, फ्रान्स इत्यादी राष्ट्रांच्या सरासरी ३० ते ४० टक्क्यांच्या तुलनेत भारताचा या क्षेत्रातील वाटा नगण्य म्हणजे ३ ते ५ टक्के असल्याचे सांगून जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत टिकायचे असल्यास भारताने लॉजिस्टिक कॉस्टवर लक्ष देणे गरजेचे आहे. किनारपट्टी नौकावहन आणि आंतरदेशीय जलवाहतूक ही मुख्यत: जड मालवाहतुकीसाठी इंधन आणि मूल्य परिणामकारक, पर्यावरण पूरक आहे. जेव्हा की, रस्ते वाहतुकीमुळे दीड रुपया प्रति किलोमीटर तर रेल्वे वाहतुकीमुळे एक रुपया प्रति किलोमीटर खर्च येतो. जर जलवाहतुकीला प्राधान्य दिल्यास हा खर्च कमी होऊन २५ ते ३० पैशांपर्यंत येईल, याकडे लक्ष वेधत किनार्‍यालगत नौकावहन मंत्रालयानी समुद्रीय नौकावहन, पर्यावरण आणि विभागीय विकास दृष्टिकोन समोर ठेवून एक प्रारूप तयार केले असून यामुळे कॉर्गो वाहतूक आणि क्रुझ पर्यावरणाला प्रोत्साहन मिळणार आहे.
नौकावहनाद्वारे मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील सेवा कर कमी केला आहे. तसेच सरकारने येत्या पाच वर्षांसाठी किनार्‍यालगतच्या नौकावहन जसे की, रो-रो, हायब्रीड रो-रो, कार, ट्रक वाहतूक इत्यादींच्या सेवाकरात शिथिलता आणली आहे. नौकावहनाला प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालयाने प्राथमिक तत्त्वावर काही पाऊले उचलली असून जीडीपीमध्ये दोन टक्के अतिरिक्त वाटा देण्याचे ठरविले आहे. तसेच ५० लाख रोजगार उपलब्ध करण्याचे उद्दिष्टही असल्याचे गडकरींनी सांगितले.
नौकावहन मंत्रालयाअधीन सर्व विभागांचे कामकाज आधुनिक संगणक आणि संपूर्ण सुविद्य यंत्रणायुक्त असेल. तसेच त्यांचे सरकार भ्रष्टाचाराला थारा देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील डहाणू येथील वाधवान, कन्याकुमारीजवळच्या कोलाचेल आणि पश्‍चिम बंगालमधील सागर बेट या तीन मुख्य बंदरांची बांधणी करण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी जाहीर केले. वाधवान बंदर हे जेएनपीटी आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे बांधण्यात येईल. ज्यामुळे न्हावा-शेवा येथील जेएनपीटी बंदरावरील अतिरिक्त ताण कमी होईल.
या परिषदेला नौकावहन मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव गौतम चॅटर्जी, नौकानयन विभाग मुंबईचे महासंचालक दीपक शेट्टी, असोचॅमचे अध्यक्ष सुनील कनोरिया उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26509

Posted by on Jan 14 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (916 of 2477 articles)


नवी दिल्ली, [१३ जानेवारी] - माजी लेफ्टनंट जनरल जे.एफ.आर.जेकब यांचे बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ९२ वर्षे ...

×