Home » कृषी, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार

२०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करणार

=पंतप्रधान मोदींचे स्वप्न=
Prime Minister Narendra Modi at Kisan Kalayan Rally in Bareillyबरेली, [२८ फेब्रुवारी] – देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना म्हणजे स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होईपर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून, राज्य सरकारांनी कृषी व शेतकर्‍यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
पीकविमा योजनेचा शुभारंभ केल्यानंतर शेतकर्‍यांशी थेट संवाद साधण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज रविवारी बरेली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान मोदी बोलत होते.
आमच्या देशातील शेतकरी जनपोषक आहे, तो श्रमाची देवता व अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आभार मानून त्यांना नमन करतो. २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे माझे स्वप्न आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. आज देशातील शेतकर्‍यांसमोर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत, शेतकरी कुटुंब विभक्त होत आहे व जमिनीचेही वाटप होत आहे. परंतु, भविष्यात जमिनीचे वाटप शक्य होईल की नाही, ते सांगता येत नाही. जमीन कमी होत गेली, तर उत्पन्नातही घट होते, असेही मोदी म्हणाले.
या पार्श्‍वभूमीवर आव्हानांचा सामना करणे आणि त्यावर तोडगा काढणे कठीण आहे. जर शेतकरी आणि राज्य सरकारे तयार असतील तर कृषी विभाग केंद्राकडे असावा. कृषी व शेतकर्‍यांसाठी असे होणे आवश्यक आहे. कृषी विभाग पूर्णपणे केंद्राकडे नसून, राज्यांकडेही बरेच अधिकार आहेत. ईश्‍वरानंतर कोणीही शेतकर्‍यांची मदत करत नाही. त्यामुळे राज्य सरकारांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.
केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या वेदना समजून घेते. परंतु, उत्तरप्रदेश सरकार शेतकर्‍यांबद्दल असंवेदनशील आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यावेळी बोलताना केला. आता पंतप्रधान पीकविमा योजना शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यापुढे शेतकर्‍यांचे जेवढे नुकसान होईल, तेवढी नुकसान भरपाई त्यांना मिळेल, असेही राजनाथसिंह म्हणाले.
झुमका गिरा रे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत बरेलीचे खूप कौतुक केले. बालपणी मी बरेलीबाबत खूप काही ऐकले होते. परंतु, मी प्रथमच येथे आलो आहे. पहिल्यांदा येथे आल्यानंतर मिळालेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे, असे ते म्हणाले. ‘मैने सुना है की, बरेली में झुमका गिरा था’, असे पंतप्रधान मोदींनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. भविष्यात कोणतीही निवडणूक नसतानाही एवढ्या मोठ्या संख्येत शेतकरी बांधव उपस्थित झाल्याचे समाधान पंतप्रधानांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसत होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26941

Posted by on Feb 29 2016. Filed under कृषी, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कृषी, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (799 of 2477 articles)


नवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] - ‘फ्रिडम २५१ ’ या स्वस्तात मिळणार्‍या स्मार्टफोनसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात मागणी नोंदविल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ...

×