Home » छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण » २६/११ चा हिरो ‘मॅक्स’चे निधन

२६/११ चा हिरो ‘मॅक्स’चे निधन

Max-Dog-26-11 heroमुंबई, [९ एप्रिल] – २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याविरोधात लढा देण्यात मोलाची कामगिरी बजावणार्‍या ‘मॅक्स’या श्‍वानाचा शुक्रवारी संध्याकाळी मृत्यू झाला. आज त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. १२ वर्षांचा मॅक्स गेल्या अनेक वर्षापासून बॉम्ब शोध व विल्हेवाट पथकात कार्यरत होता.
२८ आक्टोबर २००४ रोजी जन्म झालेला मॅक्स हा २ महिन्याचा असताना मुंबई बॉम्बस्फोटक पथकात दाखल झाला होता. पुण्याच्या प्रशिक्षण केंद्रात त्याला प्रशिक्षण देण्यात आले होते. मॅक्सने मुंबई वरील २६/११ हल्ल्याच्यावेळी मोलाची भूमिका निभावली होती. मॅक्सने ८ किलो आरडीएक्स आणि २५ ग्रेनाईड पकडून दिले होते. यामुळे मुंबईतील शेकडो लोकांचे प्राण वाचले होते. त्याच्या या कामागिरीबद्दल त्याला ‘गोल्ड मेडल’ने गौरविण्यात आले होते. त्याचबरोबर ‘झवेरी बाजार’ मधील स्फोटात मक्सने स्फोटके शोधली होती.
गेल्या वर्षी २०१५ मध्ये मे महिन्यात मॅक्स निवृत्त झाला. त्यानंतर त्याला विरार येथे प्राणी मित्र फिजा शहांसोबत राहात होता. अशी माहिती माजी मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. मॅक्सला काही महिन्यांपासून श्‍वसनाचा त्रास होता. ‘फि जा फार्म’ मध्ये त्याच्यावर उपचारही सुरू होते. त्याच्यासोबत या फार्ममध्ये गोल्डी, टायगर, सुलतान आणि सिजर हे श्‍वानही होते. गेल्या वर्षी गोल्डीचे निधन झाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27772

Posted by on Apr 9 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, मुंबई-कोकण (504 of 2476 articles)


=आसाम वाचावा, ही अपेक्षा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कॉंग्रेसला लक्ष्य= [caption id="attachment_27596" align="alignleft" width="300"] Prime Minister Narendra Modi addressing the ...

×