Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » अंतर्गत कारभारात ढवळाढवळ मान्य नाही

अंतर्गत कारभारात ढवळाढवळ मान्य नाही

=सुषमा स्वराज पाकवर बरसल्या=
Sushma-Swaraj3नवी दिल्ली, [११ ऑगस्ट] – अतिरेक्यांचे उदात्तीकरण आम्हाला मुळीच मान्य नसून, पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करणे तत्काळ थांबवावे, असा स्पष्ट इशारा परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी दिला आहे.
आठ जुलै रोजी खोर्‍यात हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणीचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकार्‍याने युनोच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन व अमेरिका यांच्यासह युरोपियन युनियन, इस्लामिक सहकार्य संघटना व आसियान देशांच्या राजदूतांशी चर्चा केली. असे करून पाकिस्तान भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत आहे, असे सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून खोर्‍यात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय अधिकार्‍यांनी मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. मात्र, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भारत पाकिस्तानच्या अशा कारवाया स्पष्टपणे फेटाळून लावतो, असेही स्वराज यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानच्या दुष्प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी सरकारने अनेक देशांशी चर्चा केली. जम्मू-काश्मीरचे लोक भारतीय नागरिक आहेत आणि त्यांच्याबद्दल असलेल्या जबाबदारीची सरकारला जाणीव आहे. भारतीय सुरक्षा दलांनी आपल्याकडून संयम पाळला आणि खोर्‍यातील हिंसक निदर्शनांदरम्यान सुरक्षा दलांचे १७८० पेक्षा जास्त जवान जखमी झाले, असेही स्वराज यांनी नमूद केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29188

Posted by on Aug 12 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (127 of 2453 articles)


=राज्यसभेत राजनाथसिंह कडाडले, पंतप्रधानांच्या उपस्थितीत उद्या सर्वपक्षीय बैठक= नवी दिल्ली, [१० ऑगस्ट] - जगातील कोणतीही ताकद काश्मीरला भारतापासून वेगळे करू ...

×