Home » ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य » अंतिम टप्प्यातही विक्रमी मतदान

अंतिम टप्प्यातही विक्रमी मतदान

Jammu and Kashmir Votingनवी दिल्ली, [२० डिसेंबर] – झारखंड आणि जम्मू-काश्मिरात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातही विक्रमी मतदान झाले. झारखंडमध्ये या टप्प्यात ७०.४२ टक्के आणि जम्मू-काश्मिरात ५४.२ टक्के मतदान झाले.
झारखंडमधील पाचही टप्प्यातील मतदानाची सरासरी ६६ टक्के इतकी आहे. २००९ च्या निवडणुकीतील मतदानापेक्षा ही टक्केवारी ९ टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. शेवटच्या टप्प्यात राज्यातील १६ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या टप्प्यात एकूण ११३६ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.
जम्मू-काश्मिरात पाचव्या टप्प्यात पुन्हा एकदा विक्रमी ५४.२ टक्के मतदान झाले आहे. या राज्यातील पाचही टप्पे मिळून मतदानाची एकूण टक्केवारी ६५ टक्के इतकी आहे. राज्याच्या २५ वर्षांच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19120

Posted by on Dec 21 2014. Filed under ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, झारखंड, ठळक बातम्या, राज्य (2316 of 2452 articles)


लामजना, [१९ डिसेंबर] - लातूर - उस्मानाबाद जिल्हयांतील सीमेवरील किल्लारीसह लामजना, खरोसा, मंगरूळ, गुबाळ,लिंबाळा बाणेगावसह परिसरातील अनेक गावांना गुरूवारी रात्री ...

×