Home » ठळक बातम्या, वाणिज्य » अंबानींची नवी पिढी व्यवसायात दाखल

अंबानींची नवी पिढी व्यवसायात दाखल

मुंबई, [८ ऑगस्ट] – रिलायंस इंडस्ट्रिजची नविन पिढी व्यवसायात दाखल होत आहे. रिलायंस इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा थोरला मुलगा आकाश आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल या दोन्ही चुलत भावांनी कौटुंबीक व्यवसायात पाऊल ठेवले आहे.
आकाश आणि जय अनमोल या दोघांनीही चार महिन्याच्या फरकाने वडीलांच्या व्यवसायात प्रवेश केला आहे. यापूर्वी मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाने रिलायंसमध्ये प्रवेश केला होता. आकाश आणि त्याचे वडील मुकेश अंबानी यांचा लंडनमध्ये ४४६१८कोटी रूपयांचा कॉन्ट्रक्ट आहे. आकाश आपल्या वडीलांना व्यवसायात मदत करतो. त्याच्याकडे रिलायंस समुहाचे ३ कोटी रूपयांचे शेअर्स आहे. तर अनमोल हा अनिल अंबानी समुहाचा पॉलीमर व्यवसाय साभांळत आहे. त्याच्या नावावर १७ कोटी रूपयांचे शेअर्स आहे. देशातील तरूण अब्जाधिशांमध्ये अनमोलचे नाव येते.
या दोघांचे आजोबा धिरूभाई अंबानी यांनी अगदी शुन्यातून रिलायंसची उभारणी केली होती. त्यांच्यानंतर त्यांची दोन मुले मुकेश आणि अनिल यांनी वडीलांचा व्यवसाय पुढे नेला आणि आता या दोघांची मुलेही या व्यवसायात आले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14733

Posted by on Aug 9 2014. Filed under ठळक बातम्या, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, वाणिज्य (2382 of 2455 articles)


नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] - शेअर बाजारात सध्या असलेल्या तेजीचा परिणाम विविध कंपन्यांकडून केल्या जाणार्‍या कॅम्पस सिलेक्शनवरही झाला असून, आयआयटी ...

×