Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » अजित पवार, तटकरेंच्या ३०८ बोगस कंपन्या

अजित पवार, तटकरेंच्या ३०८ बोगस कंपन्या

=सोमय्या यांचा बॉम्बगोळा=
kirit-somaiya_2मुंबई, [२३ ऑक्टोबर] – सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांची कसून चौकशी सुरू असतानाच, भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी आज शुक्रवारी नवा बॉम्बगोळा टाकला. सिंचनात घोटाळा करून अमाप संपत्ती कमावण्यासाठी अजित पवार आणि तटकरे यांनी ३०८ बोगस कंपन्या स्थापन केल्या होत्या, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी अर्थ खात्याचे सचिव आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांना पत्र लिहून पवार व तटकरे यांच्या बोगस कंपन्यांकडे लक्ष वेधले आणि दोघांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोंढाणे धरणा प्रकल्पातील भ्रष्टाचारासाठी एफ. ए. कन्स्ट्रक्शनने या नेत्यांना लाच देण्यासाठी युनियन बँकेतून ८०० कोटी रुपये काढले. ही रक्कम पचविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची बोगस बिले सादर करण्यात आली होती, असा आरोप सोमय्या यांनी पत्रात केला आहे. शिवाय कोंढाणे धरणाची किंमत वारंवार वाढविण्यात आली, याकडेही सोमय्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि सुनील तटकरे यांची एसीबीकडून मागील तीन दिवसांपासून चौकशी सुरू आहे. त्यातच सोमय्या यांनी नवा आरोप केल्याने आता दोघांची अडचण आणखीच वाढणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25274

Posted by on Oct 24 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1294 of 2451 articles)


ओबामांच्या दरबारी शरीफ नरमले संयुक्त निवेदनात दिली ग्वाही काश्मीर प्रश्‍नी हस्तक्षेपास अमेरिकेचा नकार वॉशिंग्टन, [२३ ऑक्टोबर] - भारताला झुकविण्यासाठी ...

×