किमान तापमान : 28.44° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 4.59 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
26.59°C - 29.99°C
broken clouds26.4°C - 29.57°C
few clouds26.26°C - 28.74°C
few clouds25.44°C - 28.53°C
sky is clear25.35°C - 28.88°C
sky is clear25.62°C - 29.09°C
scattered clouds=दुसर्या कार्यकाळासाठी राजन उत्सुक=
लंडन, [१३ मे] – रिझर्व्ह बँकेचा गर्व्हनर म्हणून जबाबदारी पार पाडताना प्रत्येक क्षणाचा आनंद लुटल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले असून, अजून बरेच काही करायचे बाकी असल्याचे सांगून आपण दुसर्या कार्यकाळासाठी उत्सुक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येणार असून, सुब्रमण्यम् स्वामी यांच्यासह सत्तारूढ भाजपातील काही घटकांचा रघुराम राजन यांना दुसरा कार्यकाळ देण्यास विरोध आहे, हे विशेष.
पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी राहून गेलेल्या अनेक गोष्टी पूर्ण करायच्या आहेत, असे राजन यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले. दुसरा कार्यकाळ न मिळाल्यास मध्यवर्ती बँकेचा प्रमुख म्हणून निश्चित केलेला अजेंडा अर्धाच पूर्ण झाला, असे वाटणार नाही का, असा प्रश्न विचारला असता, हा चांगला प्रश्न असल्याचे राजन म्हणाले. आम्ही बरेच काही साध्य केले असले तरी अजून बरेच काही करायचे असल्याचे स्पष्टपणे न सांगता तसे संकेत त्यांनी दिले.