Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अटलजींना आज ‘भारतरत्न’ने गौरविणार

अटलजींना आज ‘भारतरत्न’ने गौरविणार

=राष्ट्रपती मुखर्जी स्वत: वाजपेयींच्या निवासस्थानी जाणार, मालवीय यांचा ३१ मार्चला होणार सन्मान=
atalbihari bajpayee, madanmohan malviyaनवी दिल्ली, [२६ मार्च] – माजी पंतप्रधान व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना जाहीर झालेला ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शुक्रवार, २६ मार्च रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वत: ६ कृष्ण मेनन मार्ग, या अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन भारतरत्न पुरस्काराने त्यांचा सन्मान करणार आहेत. २५ डिसेंबर २०१४ रोजी अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. साधारणपणे राष्ट्रपतिभवनात समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान केला जातो. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे अटलबिहारी वाजपेयी स्वत: उपस्थित राहू शकणार नसल्याने, विशेष बाब म्हणून स्वत: अटलजींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घेतला आहे.
येत्या ३१ मार्चला पंडित मदनमोहन मालवीय यांचाही भारतरत्न पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. मालवीय यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. भारतीय राजकारणातील अमूल्य योगदानासाठी वाजपेयी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘उत्कृष्ट संसदपटू’ अशी ओळख असलेल्या वाजपेयी यांनी तीनवेळा पंतप्रधानपद भूषविले. आधी १३ दिवसांसाठी, नंतर १३ महिने आणि तिसर्‍या वेळी सलग पाच वर्षे अटलजी देशाचे पंतप्रधान होते. १९९६ मध्ये वाजपेयी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर १९९८ ते २००४ या काळातही ते पंतप्रधान होते.
अटलबिहारी वाजपेयी तब्बल नऊवेळा लोकसभेचे, तर दोनदा राज्यसभा सदस्य होते. सुमारे पाच दशकांची अटलजींची संसदीय कारकीर्द अतिशय गौरवास्पद अशी आहे. मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात वाजपेयी यांनी परराष्ट्र मंत्री या नात्याने महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. २५ डिसेंबर रोजी अटलजींचा वाढदिवस असतो. त्यामुळे त्याचदिवशी त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून सरकारने त्यांना वाढदिवसाची सर्वोत्तम भेट दिली होती.
२५ डिसेंबर हा दिवस देशभर ‘सुशासन दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आधी गेल्या १६ मार्चला वाजपेयी यांना भारतरत्नने सन्मानित केले जाणार होते. परंतु, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह परदेश दौर्‍यावर असल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आतापर्यंत ४३ जणांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21735

Posted by on Mar 27 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1846 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२५ मार्च] - नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या रेडिओ वरील कार्यक्रमाद्वारे लोकांशी संवाद साधला. आता ...

×