Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » अटलजींसारखा पुढाकार घेण्याची गरज : मेहबुबा

अटलजींसारखा पुढाकार घेण्याची गरज : मेहबुबा

=राजनाथसिंह, डोभाल यांची घेतली भेट=
mehbooba-muftiनवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – गेल्या महिनाभरापासून अशांतता आणि तणाव कायम असलेल्या काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी सलग ३१ व्या दिवशी काश्मीर खोर्‍यात संचारबंदी लागू असताना मेहबुबा मुफ्ती यांनी दिल्लीत येऊन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्थितीचा उपयोग जम्मू-काश्मीरच्या जनतेशी संवाद करणे आणि त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी करतील अशी अपेक्षा आहे. काश्मिरी लोकांची मने जिंकण्यासाठी अटलजींच्या कार्यकाळात जसा पुढाकार घेण्यात आला होता, तसा पुन्हा घेण्याची गरज आहे, असेही मेहबुबा म्हणाल्या. काश्मिरी लोक आमचेच आहेत आणि त्यांच्या जखमांवर फुंकर मारण्याची गरज आहे. चर्चेची प्रक्रिया सुरू केल्यास परिस्थिती सुधारू शकते आणि आम्ही हे केले पाहिजे. योग्य पद्धतीने संवादाची प्रक्रिया सुरू झाल्यास जम्मू-काश्मीर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सेतू बनू शकतो, असा विश्‍वासही मेहबुबांनी व्यक्त केला.
मेहबुबा मुफ्ती यांनी राजनाथसिंह यांची भेट घेतली त्यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह हेदेखील उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29176

Posted by on Aug 9 2016. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (131 of 2452 articles)


=हाफिझचे मुस्लिम देशांना आवाहन, संयुक्त राष्ट्रसंघावरही आगपाखड= इस्लामाबाद, [८ ऑगस्ट] - हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाउद्दिनने भारताला आण्विक युद्धाची धमकी दिली ...

×