Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » अतिरेक्यांवर कारवाई करू नका!

अतिरेक्यांवर कारवाई करू नका!

=पाक लष्कर प्रमुखांचा शरीफांना इशारा=
pak general raheel-sharifनवी दिल्ली, [५ जानेवारी] – पंजाबच्या पठाणकोट हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानचेच होते, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे भारताने पाकला सादर केल्यानंतर, या हल्ल्याची पूर्वकल्पना असलेल्या पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख राहिल शरीफ यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना, पठाणकोट हल्ल्याच्या सूत्रधारांविरोधात कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
या घडामोडीशी संबंधित सूत्रांकडून ही माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झाली आहे. पठाणकोट येथील वायुसेनेच्या लष्करी तळावरील हल्ल्याची आणि पाकमध्ये त्यासाठी रचण्यात आलेल्या कटाची राहिल शरीफ यांना आधीपासूनच माहिती होती. त्यातच हे सर्व हल्लेखोर पाकचेच असल्याचे ठोस पुरावे एनआयएला मिळाल्यानंतर ते पुढील कारवाईसाठी पाक सरकारकडे पाठविण्यात आले. पाककडूनही पुरावे मिळाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तथापि, राहिल शरीफ यांनी नवाझ शरीफांना हल्ल्याच्या सूत्रधारांविरोधात कारवाई न करण्याचा इशारा दिला आहे.
आम्हाला कोणत्याही किमतीत भारतासोबतचे संबंध सुरळीत होऊ द्यायचे नसल्यामुळे कारवाईचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. भारत-पाकमधील शांतता चर्चेला लष्कराचा विरोध आहे. नवाझ शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करू शकतात. आमचा त्यास मुळीच विरोध नाही. पण, दहशतवादी गटांविरोधात सरकारने कारवाई केल्यास ती कदापि मान्य केली जाणार नाही, असेही राहिल शरीफ यांनी पंतप्रधान शरीफांना सांगितले असल्याचे वृत्त याच देशातील काही वृत्तवाहिन्यांनीही दिले आहे.
भारताला या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहे. त्यात तथ्यता आहे. जैशच्याच अतिरेक्यांनी हा हल्ला केला असून, रावळपिंडीतील नूर खान हवाई दलाच्या तळावर अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. अतिरेक्यांकडून येथे चार ते पाच वेळा हल्ल्याची रंगित तालिम करण्यात आली होती. त्यानंतर पाकच्या पंजाब प्रांतातील बहवालपूर येथेही त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते, असेही वाहिन्यांच्या वृत्तात म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26430

Posted by on Jan 6 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (942 of 2458 articles)


नवी दिल्ली, [५ जानेवारी] - पठाणकोटमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजीत असून या हल्ल्याची माहिती पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांना ...

×