Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » अनिवासी भारतीयांचा मताधिकार

अनिवासी भारतीयांचा मताधिकार

=आयोगाचा प्रस्ताव मान्य करा : सुप्रीम कोर्टात केंद्राची भूमिका=
supreme_court_1नवी दिल्ली, [१२ जानेवारी] – जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या अनिवासी भारतीयांना टपालाच्या माध्यमातून भारतातील निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देणारा निवडणूक आयोगाचा प्रस्ताव मान्य करण्यात यावा, अशी भूमिका केंद्र सरकारने आज सोमवारी सर्वोच्च न्यायालयात विशद केली.
केंद्राच्या भूमिकेची दखल घेत सरन्यायाधीश एच. एल. दत्तू आणि न्या. ए. के. सिकरी यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी आतापर्यंत कोणती पावले उचलण्यात आली, याविषयीची माहिती सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ आठवड्यानंतर करण्याचे निश्‍चित केले.
निवडणूक आयोगाचे मत आणि शिफारशी केंद्र सरकारने मान्य केल्या असल्यामुळे आता त्याचा पाठपुरावा करण्यात यावा. शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवी, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी. एल. नरसिंहा यांनी न्यायालयात केंद्राची भूमिका मांडली. आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी काही आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याची आवश्यकता असून, विधी मंत्रालयाने त्या दिशेने पावले उचलली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19586

Posted by on Jan 13 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2254 of 2453 articles)


भागीदारीसाठी उद्योगाचा शोध सुरू रेल्वे डबे, इमारतींचेही रक्षण करण्याची क्षमता तिरुवनंतपुरम्, [१२ जानेवारी] - गेल्या वर्षी ‘मंगळ’ भरारी घेणार्‍या ...

×