Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » अनेक देशांत लोकशाही रुजलीच नाही

अनेक देशांत लोकशाही रुजलीच नाही

=आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन=
UN SECRETARY GENERAL MEETS WITH SPANISH PRESIDENTन्यूयॉर्क, [१४ सप्टेंबर] – आधुनिक व प्रगत मानवी मूल्यांवर आधारित जगाची मुहूर्तमेढ रोवण्यात सर्वांना सोबत घेऊन जाणार्‍या लोकशाही व्यवस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, हे आता सर्वमान्य झाले आहे. जगात अमेरिका, इंग्लंड व भारताने तर लोकशाहीच्याच माध्यमातून सामाजिक, आर्थिक, राजकीय व अन्य क्षेत्रांचा विकास साधला. लोकशाहीचे हे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष आमसभेचे आयोजन १५ सप्टेंबर २००७ रोजी करण्यात आले होते. यात विशेष ठराव पारित करून १५ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून जगात सर्वत्र साजरा करण्यात यावा, असे ठरले. तेव्हापासून हा दिन आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
तसे पाहता १९८८ मध्ये फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष कोरॅजॉन सी. ऍक्विनो यांच्या अध्यक्षतेखाली एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नवीनच लोकशाही प्रणाली स्वीकारलेल्या देशांमध्ये लोकशाहीची मूल्ये प्रस्थापित करणे हा या परिषदेचा मुख्य हेतू होता. मात्र, या प्रयत्नांना अधिक आखीवरेखीव व काटेकोर स्वरूप यायला २००७ साल उजाडावे लागले. लोकांमध्ये जागरुकता आणणे आणि त्यांच्यात लोकशाहीची तत्त्वे रुजविणे, हा या दिनाचा मुख्य हेतू आहे. लोकांनी आपले हक्क, अधिकार तसेच कर्तव्याविषयी सजग रहावे आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास साधून घ्यावा, या उद्देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध उपक्रम या निमित्त आयोजित करण्यात येतात. विशेष म्हणजे ज्या देशात अद्यापही हुकूमशाही आहे, सत्तेचे केंद्रीकरण काही मूठभर लोकांच्याच हाती आहे आणि जेथे निरंकुश सत्ता राबविण्यात येते, अशा जगातील अनेक देशांत लोकशाहीची मूल्ये रुजविण्याचा अथक प्रयत्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून होत आहे. उत्तर कोरिया, लिबिया, सीरिया, म्यानमार, इराक तसेच अनेक आफ्रिकन देशांत लोकशाही अगदी औषधालाही नाही. तसेच युरोपातील अनेक देशातही लोकशाहीची तत्त्वे मुळीच रुजली नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या एकूणच जीवनावर अतिशय विपरित परिणाम झाला आहे. त्यांची प्रगती खुंटली. महिला सशक्तीकरण, बालकांचे हक्क आणि अधिकार, कामगार व श्रमजिवी वर्ग यांचे प्रश्‍न अतिशय गंभीर आहेत. भारतासारख्या लोकशाही स्वीकारलेल्या देशातही लोकशाहीची मूलभूत तत्त्वे अद्याप रुजलेली नाहीत, हे वास्तव आहे. स्वातंत्र्य, समता व बंधुतेचा उद्घोष मोठ्या प्रमाणात होतो. पण, भारतातील अनेक प्रांतात अद्याप सरंजामशाहीचेच वातावरण आहे. त्यामुळे भारतासह आशियाई राष्ट्रे आणि अन्य विकसनशील देशातील लोकशाही संस्थांचे बळकटीकरण करणे ही काळाची गरज आहे. आजच्या आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा हाच विशेष संदेश आहे.
नागरी समाज लोकशाहीचा प्राणवायू आहे. नागरी समाज सामाजिक प्रगती आणि आर्थिक विकासासाठी प्रेरक म्हणून कार्य करतो. सरकारला उत्तरदायी ठरविण्यात तो महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. आर्थिक व सामाजिक दुर्बल वर्गाचे हित साधण्यात नागरी समाज महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो.
बान की मून

Short URL: https://vrittabharati.in/?p=23807

Posted by on Sep 15 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1477 of 2458 articles)


मुंबई, [१४ सप्टेंबर] - विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विशेष बुद्धिमत्तेचे मापन करण्याच्या दृष्टिकोनातून शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे तीन विषयांचा शिष्यवृत्ती परीक्षेत ...

×