Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » अफगाणिस्तानात भारतीय दुतावासजवळ स्फोट

अफगाणिस्तानात भारतीय दुतावासजवळ स्फोट

Afghanistan mapअफगाणिस्तान, [५ जानेवारी] – अफगाणिस्तानमधील जलालाबाद येथे भारतीय दुतावासजवळ आज मंगळवारी दुपारच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये जलालाबाद शहरात भारतीय दुतावासापासून ४०० मीटर अंतरावरच हा स्फोट झाला. भारतीय दुतावासजवळच पाकिस्तानी दुतावास असल्यामुळे हा स्फोट भारतीय दुतावासाला लक्ष्य करून केला नसल्याचे सूत्रांकडून कळले आहे. सुरक्षा रक्षकांनी हा परिसर ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. या हल्ल्याबाबत अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानातील मजार -ए – शरीफ येथे भारतीय दूतावासावर हल्ला झाला होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26438

Posted by on Jan 6 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (939 of 2458 articles)


मुंबई, [६ जानेवारी] - मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्ब स्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारागृहात असलेला आरोपी संजय दत्तचे कारागृहातील वर्तन ...

×