Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » अफजलवरील कार्यक्रम रद्द करण्यास कन्हैयाचा विरोध होता

अफजलवरील कार्यक्रम रद्द करण्यास कन्हैयाचा विरोध होता

=जेएनयू रजिस्ट्रारचा खुलासा=
bhupinder zutshi jnu reg.नवी दिल्ली, [७ मार्च] – संसद हल्ल्याप्रकरणी फासावर लटकविण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी अफजल गुरूच्या समर्थनार्थ गेल्या ९ फेबु्रवारी रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आयोजित कार्यक्रम रद्द करण्यासाठी दबाव येत असताना, विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमारने कार्यक्रम रद्द करण्यास विरोध दर्शविला होता, असा स्पष्ट खुलासा जेएनयूचे रजिस्ट्रार भूपिंदर जुत्शी यांनी केला आहे. यामुळे देशविरोधी कार्यक्रमात कन्हैयाचाही थेट सहभाग होता, हे आता उघड झाले आहे.
जेएनयूमध्ये आयोजित या कार्यक्रमात अफजल गुरूच्या समर्थनार्थ आणि भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी कन्हैयावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली होती. सध्या तो अंतरिम जामिनावर आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर आपण भारतविरोधी घोषणा दिल्या नसल्याचे त्याने म्हटले आहे. कॉंगे्रस पक्ष आणि या पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी कन्हैयाची पाठराखण करीत असताना, जेएनयूच्या रजिस्ट्रारने केलेल्या खुलाशामुळे या घटनेचे राजकारण करणारे लोक आता तोंडघशी पडले आहेत.
आपल्या अहवालात जुत्शी म्हणाले की, जेएनयूत ९ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यक्रमाला परवानगी न देण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयावर कन्हैयाने आक्षेप घेतला होता. जेएनयूतील अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याबाबत त्याच दिवशी माझ्या कार्यालयात जेएनएसयूच्या नेत्यांना बोलविण्यात आले होते. कन्हैया आणि रामा नागा यांच्यासोबत माझी दुपारी तीन वाजता या विषयावर चर्चा झाल्यानंतर त्याठिकाणी अभाविपचे सौरव शर्मा आले. त्यांच्यासोबतही माझी चर्चा झाली. या चर्चेनंतर शर्माने अफजल गुरुच्या फाशीविरोधात साबरमती ढाबा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रक मला दाखविले. हे पत्रक मी जेएनयू प्रशासनाला दाखविल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्यावेळी कन्हैयाने कार्यक्रम रद्द करण्यावर आक्षेप नोंदविला होता.
साबरमती ढाब्यावर आयोजित कार्यक्रमाच्या चौकशीसाठी दुसर्‍याच दिवशी शिस्तपालन समिती गठित करण्यात आली. या समितीने दिलेल्या प्राथमिक अहवालात कन्हैयासह आठ जणांवर आरोप ठेवण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27099

Posted by on Mar 7 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (740 of 2452 articles)


=मानव संसाधन मंत्रालयाचा खुलासा= नवी दिल्ली, [७ मार्च] - केंद्रीय मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी यांना आता यमुना एक्सप्रेस वेवर ...

×