Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » अमिताभ यांच्यापासून २० फुटांवर गोळीबार !

अमिताभ यांच्यापासून २० फुटांवर गोळीबार !

=चित्रपट सेनेचे शिंदे जखमी, गोरेगाव फिल्मसिटीतील घटना=
amitabh-bachchan-700newमुंबई, [२२ मे] – गोरेगाव फिल्मसिटीच्या गेटवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून अवघ्या २० फूट अंतरावर हा गोळीबार झाला. खुद्द अमिताभ यांनीच ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बाईकवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी फिल्मसिटीच्या गेट नंबर दोनवर सुरक्षा कंत्राटदाराच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात कंत्राटदार श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. एक गोळी शिंदे यांच्या हाताला चाटून गेली तर दुसरी गोळी पोटात घुसली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिंदे यांना तातडीने मालाड येथील लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्यांना विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालायात हलवण्यात आले आहे. शिंदे हे शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस आहेत आणि त्यांचा केबलचाही व्यवसाय असल्याचे सांगण्यात आले.
फिल्मसिटीच्या गेटवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोर मोटारसायकल रस्त्यातच सोडून जंगलात पळून गेल्याची माहिती आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच आरे कॉलनी पोलिसांनी घटनास्थळ गाठत हल्लेखोरांची दुचाकी ताब्यात घेतली आहे. या दुचाकीचा मालक कोण ? याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी आरटीओकडील रेकॉर्डचीही मदत घेतली जाणार आहे. शिंदे यांना कुणी धमकावले होते का?, याचाही तपास आम्ही करत आहोत, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी सांगितले.
महानायकाचा थरारक अनुभव
अमिताभ बच्चन चित्रिकरणासाठी आज फिल्मसिटीमध्ये आले होते. त्याचवेळी नेमके हे ‘शूटआऊट’ घडले. हा थरार अमिताभ यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला. ‘फिल्मसिटीत माझे शूटिंग सुरू आहे आणि अवघ्या २० फूट अंतरावर खरेखुरे शूटआऊट घडले आहे. या शूटआऊटमध्ये एक जण ठारही झाला आहे’, असे ट्विट अमिताभ यांनी केले. याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली असता गोळीबार झाला. मात्र, त्यात कोणीही मृत झालेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22654

Posted by on May 24 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1668 of 2452 articles)


=३१ मे पर्यंत वर्षपूर्तीचा जल्लोष, २०० जाहीर सभांचे आयोजन= नवी दिल्ली, [२३ मे] - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त येत्या ...

×