Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » अमेरिकन वकिलातीवरील हल्ल्याचा कट

अमेरिकन वकिलातीवरील हल्ल्याचा कट

=पाकच्या संबंधाचे अमेरिकेने दिले भारताला पुरावे=
US EMBASSY IN NEW DELHI ON TUESDAY. PICTURE BY PREM SINGH 17 DECEMBER 2013.नवी दिल्ली, [१ फेब्रुवारी] – भारतातील अमेरिकन आणि इस्रायल वकिलातींवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी झालेल्या तपासात मिळालेले पुरावे अमेरिकेने भारताच्या स्वाधीन केले आहेत.
या कटप्रकरणी सध्या कारागृहात असलेल्या साकिर हुसेन आणि कोलंबो येथील पाकिस्तानी दूतावासात अधिकारी असलेला शाहजी यांच्यात या कटाबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याचा स्पष्ट उल्लेख या पुराव्यात आहे. या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएनेही चौकशी केली. अमेरिकेने केलेल्या तपासात काय तथ्य हाती लागले, हे जाणून घेण्यासाठी एनआयएने परस्पर कायदेशीर सहकार्य करारांतर्गत विनंती पत्र अमेरिकेला पाठविल्यानंतर या देशाकडून तपासातील पुरावे भारताच्या स्वाधीन करण्यात आले. या पुराव्यांमध्ये हुसेन आणि शाहजी यांच्यात झालेल्या ई-मेल संवादाचाही समावेश आहे.
हुसेन हा सध्या भारतीय कारागृहात शिक्षा भोगत आहे. चेन्नईतील अमेरिकन वकिलात आणि बंगलोर येथील इस्रायल वकिलातीवर २६/११ सारखाच दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचण्याच्या आरोपाखाली आयबीच्या पथकाने तामिळनाडू पोलिसांच्या मदतीने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याला अटक केली होती. हल्ल्याचा कट तडीस नेण्यासाठी मालदीवमधून दोन दहशतवादी येथे आले होते.
हुसेनने चौकशीत कोलंबोतील पाकी उच्चायोगातील व्हिसा कार्यालयात काम करणार्‍या आमिर सिद्दिकीचे नाव घेतले होते. सिद्दिकीच्या कारवायांची सविस्तर माहिती प्राप्त करण्यासाठी भारताने श्रीलंकेवर दबाव आणल्यानंतर पाक सरकारने त्याला माघारी बोलावले होते. त्याची कारकीर्द पूर्ण झाल्यानेच आम्ही त्याला परत बोलावले, असे कारण पाकने पुढे केले होते. चौकशी काळातच हुसैनने शाहजीचेही नाव घेतले होते. सिद्दिकीनेच शाहजीसोबत आपली भेट करून दिली होती. व्हिसा कार्यालयात तोदेखील मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे हुसैनचे मत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20215

Posted by on Feb 2 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2136 of 2453 articles)


मुंबई, [१ फेब्रुवारी] - महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्डने) मोठा दिलासा दिला आहे. कृषी विकासाला गती ...

×